राष्ट्रकुल स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय मल्टि-स्पोर्ट्स इव्हेंट स्पर्धा आहे, म्हणजेच या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होतात. प्रत्येक चार वर्षांनंतर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आता आगामी राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये बर्मिंगघम येथे होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही क्रिकेटसाठी आनंदाची बातमी आहे.
कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) राष्ट्रकुल स्पर्धेसाठी लागणाऱ्या पात्रता प्रक्रियेची घोषणा केली आहे. 2022 मध्ये आठ महिला संघ राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतील.
https://twitter.com/ICC/status/1328973734963625984?s=20
ही राष्ट्रकुल स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे इंग्लंड यजमान संघ म्हणून या स्पर्धेसाठी थेट पात्र झाला आहे. अशा प्रकारे कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोबर इतर संघांचे स्थान आयसीसी महिला टी20 संघ क्रमवारीनुसार निश्चित होईल. दिनांक 1 एप्रिल 2021 च्या आयसीसी महिला टी20 क्रमवारीनुसार इंग्लंड पहिले 6 संघ या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. तर एका स्थानासाठी पात्रता सामने खेळवले जातील. याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2022 असेल.
राष्ट्कुल स्पर्धेतील सर्व क्रिकेट सामने इंग्लंडमधील एजबस्टन येथे खेळले जातील. यापूर्वी 1998 मध्ये पुरुष क्रिकेट संघाने प्रथमच क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामुळे 1998 नंतर पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट खेळले जाणार आहे. 1998 ला क्वालालंपूरमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 50 षटकांच्या क्रिकेट प्रकारात दक्षिण आफ्रिका संघाने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा 27 जूलै ते 7 ऑगस्ट 2022 दरम्यान होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच ‘या’ भारतीय फलंदाजाला झाली कोरोनाची लागण
भारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना ऍडिलेड येथे होणार नाही? जोश हेझलवूडने दिली माहिती
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानावर एकत्र खेळू शकत नाही बुमराह आणि शमी; जाणून घ्या कारण
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी






