दिग्गज हॉकी क्रिकेटपटू धनराज पिल्ले यांचे म्हणणे आहे की, राणी रामपालसारखी कर्णधार आणि सविता पूनियासारखी गोलकीपर यांच्या उपस्थितीत भारतीय महिला हॉकी संघ पुढील वर्षी टोकियो ऑलिंपिकमध्ये इतिहास घडवू शकतो. टेबल टेनिसपटू मुदित दानी याच्या ‘द स्पॉटलाइट’ कार्यक्रमात बोलताना ते असे म्हणाले.
धनराज यांनी सांगतिले की, “आपल्याकडे राणीच्या रुपात सर्वश्रेष्ठ कर्णधार उपलब्ध आहे. मला वाटते की, राणी आणि सविता मिळून भारतीय महिला हॉकी संघाला पोडियमपर्यंत पोहोचवू शकतात. ऑलिंपिक स्पर्धांसाठी संघ सध्या खूप मेहनत करत आहे. त्यामुळे मला त्यांच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.”
“राणीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ २०१८साली आशियाई स्पर्धेच्या पोडियममध्ये पोहोचला होता. एवढेच नाही तर तिच्या नेतृत्त्वाखाली संघाने सलग दूसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये प्रवेश केला. संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडूंपैकी एक असणाऱ्या सवितानेही आँलिंपिकच्या क्वालिफायर सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती,” असे पुढे बोलताना धनराज म्हणाले.
याबरोबरच चार वेळा ऑलिंपियन ठरलेल्या धनराज यांचे म्हणणे आहे की, “तग धरण्याची क्षमता आणि शारिरीक क्षमता या गोष्टींच्या बाबतीत हॉकीमध्ये खूप बदल झाले आहेत. मी जी हॉकी खेळली होती आणि गेल्या १०-१५ वर्षांपासून ज्याप्रकारची हॉकी खेळल जात आहे, याच्यात कसलीही समानता नाही. वर्तमान खेळाडू त्यांच्या फिटनेस क्षमतांच्या आधारावर खेळतात.”
“फिटनेसमुळे भारतीय हॉकी संघ बदलला आहे आणि खेळाडूदेखील त्यांच्या शारिरिक क्षमता व तग धरण्याची क्षमता यांबाबत खूप गंभीर झाले आहेत. आजच्या भारतीय संघाची तुलना ऑस्ट्रेलिया, जर्मनी किंवा नेदरलँड संघांशी केली जाऊ शकते. ते जगातील कोणत्याही संघापुढे चांगला प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहू शकतात,” असे शेवटी बोलताना धनराज यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2020: आज हैदराबाद-पंजाब येणार आमने-सामने ; जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
IPL 2020: कोलकाता विरुद्ध चेन्नई सामन्यानंतरची जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी
ज्या मैदानावर त्याने रुबाब दाखवला, त्याच मैदानावर झाली त्याच्या जीवनाची अखेर
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यात होऊ शकतात ‘हे’ ५ खास विक्रम
षटकार किंग! आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारणारे ५ फलंदाज
IPL 2020: हीच ती ३ कारणे, ज्यामुळे राजस्थानला पहावे लागले पराभवाचे तोंड