---Advertisement---

IPL 2020: हीच ती ३ कारणे, ज्यामुळे राजस्थानला पहावे लागले पराभवाचे तोंड

On: बुधवार, ऑक्टोबर 7, 2020 5:20 PM
---Advertisement---

बहुप्रतिष्ठित टी२० लीग आयपीएल २०२० मधील २० सामने आतापर्यंत खेळण्यात आले आहेत. यामध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद आपल्या नावावर करणारा राजस्थान रॉयल्स संघ या हंगामात अडचणीत सापडला आहे. त्यांना या हंगामात सलग तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या चार वेळचा आयपीएल विजेता असणाऱ्या मुंबई इंडियन्सने राजस्थानला मंगळवारी (२० ऑक्टोबर) ५७ धावांनी पराभूत करत पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे. राजस्थान संघात जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. परंतु त्यांना आपली योजना मैदानावर लागू करण्यात अपयश येत आहे.

मुंबई इंडियन्सने या हंगामाची सुरुवात पराभवाने केली होती. परंतु ते आता सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून पॉईंट टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत. राजस्थान संघाला या हंगामातील आपल्या पहिल्या २ सामन्यात विजय मिळाला होता. त्यानंतर असे वाटत होते की, इतर संघांसाठी राजस्थान रॉयल्स संघ हा एक आव्हान ठरेल. परंतु असे काहीच झाले नाही. या लेखात आपण  मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला मिळालेल्या पराभवाची ३ कारणे जाणून घेणार आहोत.

राजस्थान रॉयल्स संघाच्या पराभवाची ३ कारणे- 3 Reasons Why Rajasthan Royals Gets A Defeat Against Mumbai

सूर्यकुमार यादवची खेळी

मुंबई इंडियन्स संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आणि आपल्या संघाला एका समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. मुंबईच्या फलंदाजांना रोखण्यात राजस्थानच्या गोलंदाजांना अपयश आले. सूर्यकुमारने ४७ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ७९ धावा कुटल्या. यामध्ये २ षटकार आणि ११ चौकारांचा समावेश आहे. मुंबईविरुद्धच्या पराभवाच्या कारणांमध्ये हे एक कारण आहे.

फलंदाजी ठरली फ्लॉप 

राजस्थान संघाची फलंदाजी फळी मुंबईविरुद्ध अपेक्षित कामगिरी करू शकली नाही. एकट्या जॉस बटलरने राजस्थानकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४४ चेंडू खेळत ७० धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला ३० पेक्षाही अधिक धावा करता आल्या नाहीत. सूर्यकुमारला जशी फलंदाजांची साथ मिळाली, तशी साथ बटलरला मिळू शकली नाही. राजस्थानची खराब फलंदाजी ही देखील त्यांच्या पराभवाचे दुसरे कारण आहे.

जसप्रीत बुमराहची गोलंदाजी

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हंगामातील आतापर्यंतच्या सामन्यात खास कामगिरी केली नव्हती. परंतु त्याने राजस्थानविरुद्ध आपल्या घातक गोलंदाजीचा जलवा दाखवला. त्याने ४ षटके टाकत ५ च्या इकॉनॉमीने २० धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. या विकेट्समध्ये राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथचाही समावेश होता. बुमराहची गोलंदाजी राजस्थानवर चांगलीच भारी पडली आणि हे त्यांच्या पराभवाचे तिसरे कारण आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएलमुळे ‘या’ मोठ्या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत ऑस्ट्रेलियन खेळाडू

-IPL 2020: आज कोलकाता-चेन्नई येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

-“मुंबईचा ‘सूर्य’ तळपला” राजस्थानविरुद्ध तुफानी खेळी केल्यानंतर कर्णधार रोहितकडून कौतुकाचा वर्षाव

ट्रेंडिंग लेख-

-षटकार किंग! आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारणारे ५ फलंदाज

-टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा आकडा पार करणारे ३ भारतीय क्रिकेटर

-२००३ विश्वचषकात ७ ओव्हरमध्ये ६७ धावा ते २०११ ला ३ मेडन ओव्हर टाकणाऱ्या झहीरचा आज बड्डे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---