कोरोना काळामुळे क्रिकेट सामन्यांमध्ये चाहत्यांना येण्यास बंदी टाकली होती. २०२० पासून अनेक खेळांचे सामने हे चाहत्यांच्या अनुपस्तितीमध्ये खेळवण्यात आले आहे. खेळाच्या मैदानात आपण अनेकदा पाहिले आहे की काही चाहत्यांकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित होते, कधी त्यांच्या पेहनाव्यामुळे, तर कधी त्यांनी लिहिलेल्या बोर्डमुळे, तर कधी एखादा अप्रतिम झेल त्यांनी पकडला तर, असेच काहीसे आताही घडले आहे.
एका बेसबॉल सामान्या दरम्यान एका महिलेने एका हातात बाळ असतानाही एका हाताने फाऊल चेंडू झेलला आहे, या घटनेचा व्हिडिओ सध्या पूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या महिलेचे कौतुक केले आहे.
लेक्सी व्हाइटमोर या महिलेने आपल्या लहान मुलगा मेवरीक हातात असताना एक हाताने तिने घेतलेला एक अप्रतिम झेल बघून सर्वेच आश्चर्यचकित राहिले. तिच्या झेलानंतर तिचे उपस्थित सर्व चाहत्यांनी कौतुकही केले. या अविस्मरणीय क्षणानंतर युटूबवरील एमएलबी या चॅनेलने तिच्या व्हिडिओला एक कॅप्शन दिले आहे. त्यांनी असे लिहले की ‘ती आई आहे ती काही पण करू शकते, एक फाऊल चेंडूपण पकडू शकते.’
सोशल मीडियावर हा विडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओला शेयर करताना अनेकांनी असे कॅप्शन दिले आहे की ‘आई महान असते.’
अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या बातमीची स्टोरी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे आणि तिने असेही लिहले आहे की ‘असे काहीच नाही जे आम्ही करू शकत नाही.’ (women incredible one hand catch while holding baby at baseball game will leave anushka sharma impressed)
ही अशी घटना पहिल्यांदीच नाही झाली आहे असे अनेकदा घडले आहे. जानेवारीमध्ये बिग बॅशलीगमध्ये असेच काही घडले होते. बिग बॅश लीग दरम्यान एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांनीची एक आश्चर्यजनक झेल पकडला होता. त्या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. टॉम नावाच्या चाहत्याने एका हातात त्याची ड्रिंक सांभाळताना एक अप्रतिम झेल घेतला होता.
महत्वाच्या बातम्या
टीम इंडियातील ‘हे’ ३ खेळाडू पहिल्यांदाच घेऊ शकतात इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळण्याचा अनुभव
रोनाल्डोच्या एका व्हिडिओमुळे हंगामा, कोका-कोला कंपनीला २९३ कोटींचे नुकसान
टी२० विश्वचषकापुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, ‘या’ महत्त्वाच्या दौऱ्यातून ७ खेळाडूंची माघार