महिला टी 20 चॅलेंज, म्हणजेच महिला आयपीएलच्या तिसर्या हंगामातील तिसरा सामना शनिवारी (7 नोव्हेंबर) खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 7.30 वाजता शारजाहमध्ये ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हास यांच्यात हा सामना होईल. ट्रेलब्लेझरची कर्णधार स्मृती मंधाना आणि सुपरनोव्हाजची कर्णधार हरमनप्रीत कौर यांना हा सामना जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे.
हरमनकडे आहे शेवटची संधी
मागील दोन हंगामातील चॅम्पियन सुपरनोव्हाससाठी स्पर्धेत कायम राहण्याची ही शेवटची संधी आहे. यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यात सुपरनोव्हासला वेलॉसिटी संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत त्यांना शनिवारचा सामना जिंकावाच लागेल.
वेलॉसिटी संघ आहे नशिबावर अवलंबून
भारतीय संघाची अनुभवी फलंदाज मिताली राज वेलॉसिटी संघाची कर्णधार आहे. वेलॉसिटी संघाचा अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्याचा मार्ग नशिबावर अवलंबून आहे. जर शनिवारच्या सामन्यात ट्रेलब्लेझर संघ विजयी झाला, तर वेलॉसिटी अंतिम सामन्यात प्रवेश करेल. त्याच बरोबर, सुपरनोव्हास विजयी झाल्यास वेलॉसिटी स्पर्धेतून बाहेर जाईल.
ट्रेलब्लेझरचा नेट रनरेट आहे चांगला
मागील सामन्यात ट्रेलब्लाझर्सने वेलॉसिटी संघाला 47 धावतच सर्वबाद केले. प्रत्युत्तरादाखल मंधानाच्या संघाने 7.5 षटकांत 9 गडी राखून सामना जिंकला. या विजयासह ट्रेलब्लेझरचा नेट रनरेट +3.905 झाला आहे.
ट्रेलब्लेझरची जबाबदारी असेल मंधनावर
ट्रेलब्लेझर संघात फलंदाजीची जबाबदारी कर्णधार स्मृती मंधनावर असेल. वेलॉसिटीविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात मंधाना केवळ 6 धावा करून बाद झाली होती. त्यानंतर डिंड्रा डॉटिन आणि रिचा घोष यांनी संघाला विजय मिळवून दिला होता.
इक्लेस्टोन आणि झुलन उत्कृष्ट फॉर्ममध्ये
ट्रेलब्लेझरच्या गोलंदाजीत सोफी इक्लेस्टोन आणि आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी यांच्यावर अधिक जबाबदारी असेल. इक्लेस्टोनने मागील सामन्यात 3.1 षटकांत 9 धावा देऊन 4 गडी बाद केले होते. झूलनने 3 षटकांत 13 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय राजेश्वरी गायकवाडने 2 आणि दीप्ती शर्माने एक बळी घेतला आहे.
सुपरनोव्हासमध्ये हरमनप्रीत आणि अटापट्टूवर आहे जबाबदारी
सुपरनोव्हासमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर आणि श्रीलंका टी20 क्रिकेट संघाची कर्णधार चमारी अटापट्टू यांच्यावर संघाला मोठ्या धावसंख्येवर नेण्याची जबाबदारी असेल. हंगामातील पहिल्या सामन्यात हरमनने वेलॉसिटीविरुद्ध 31 आणि अट्टापट्टूने 44 धावा केल्या होत्या. प्रिया पुनियावरही धावा काढण्याची जबाबदारी असेल.
गोलंदाजीची जबाबदारी असेल आयबॉन्गावर
सुपरनोव्हासच्या आयबॉन्गा खाकावर गोलंदाजांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असेल. खाकाने वेलॉसिटी विरुद्धच्या मागील सामन्यात 2 बळी घेतले होते. त्याचवेळी राधा यादव, पूनम यादव आणि शशिकला श्रीवर्धने यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आले.
हवामान अहवाल आणि खेळपट्टीबद्दल माहिती
शारजाहमध्ये आकाश स्वच्छ राहील. तापमान 22 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. शारजाहमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना मदत होईल. शारजाहमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. शारजाहमध्ये झालेल्या मागील 61 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 69% आहे.
या मैदानावर झालेले एकूण टी20 सामने : 13
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 9
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 4
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 149
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 131
महत्त्वाच्या बातम्या –
योग आले जुळून! हैदराबाद जिंकणार आयपीएलचा किताब? पाहा काय आहे कारण
“थँक्यू विराट”, हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयामुळे विराटची ट्विटरवर उडतेय खिल्ली
लवकरच भेटू! IPL मधील आव्हान संपल्यानंतर विराट कोहलीचे खास ट्विट
ट्रेंडिंग लेख –
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा