गुजरात जायंट्सनं महिला प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात एका तरुण खेळाडूवर मोठी बोली लावली आहे. WPL लिलावात गुजरातनं सिमरन शेखला विकत घेतलं. सिमरननं अभ्यास सोडून क्रिकेटची करिअर म्हणून निवड केली होती. ती मुंबईच्या धारावी येथून आली आहे. तिनं आपलं आयुष्य झोपडपट्टीत घालवलं. आता या प्रतिभावान क्रिकेटरला गुजरातनं तिच्या मूळ किमतीपेक्षा तबब्ल 19 पट अधिक किमतीत विकत घेतलं आहे.
महिला प्रीमियर लीग लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं सिमरन शेखवर पहिली बोली लावली. तिची मूळ किंमत 10 लाख रुपये होती. यानंतर गुजरात जायंट्स या बोलीत सामील झाले. दिल्लीनं 1.80 कोटी रुपयांपर्यंत बोली नेली. परंतु गुजरातनं 1.90 कोटी रुपयांची बोली लावून सिमरनचा संघात समावेश केला. अशाप्रकारे, सिमरनला मूळ किमतीपेक्षा 19 पट अधिक किमतीत खरेदी करण्यात आलं.
सिमरनचे वडील जाहिद अली यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितलं की, सिमरनला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. ती खेळताना अनेक जण तिला शिव्या द्यायचे. पण सिमरननं सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं. रिपोर्ट्सनुसार, सिमरननं 10वीनंतर अभ्यास सोडला होता.
सिमरन शेख ही मधल्या फळीतील फलंदाज आहे. गेल्या हंगामात तिला खरेदीदार मिळाला नव्हता. मात्र या मोसमात तिला मोठी रक्कम मिळाली. तिनं महिला प्रीमियर लीमध्ये आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. या काळात तिला 7 डावात फलंदाजीची संधी मिळाली, पण विशेष काही करू शकलो नाही. सिमरन महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सकडून खेळली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती मुंबईकडून खेळते.
हेही वाचा –
महिला प्रीमियर लीगमध्ये पैशांचा वर्षाव, लिलावात 16 वर्षीय मुलगी बनली करोडपती!
“हे ‘मूर्खासारखं क्रिकेट’….”, भारतीय गोलंदाजाच्या कामगिरीवर दिग्गज क्रिकेटर भडकला
रोहित-कोहलीपासून हार्दिक-बुमराहपर्यंत, भारताच्या स्टार क्रिकेटर्ससाठी 2024 हे वर्ष कसं राहिलं?