सध्या सर्वत्र टी-२० ब्लास्ट स्पर्धेचे वारे पसरले आहे. या स्पर्धेत २५ जून रोजी मिडलसेक्स आणि सरे या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात सरे संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. परंतु या सामन्यादरम्यान विचित्र प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात सरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मिडलसेक्स संघाकडून स्टिवी स्नेकजाईने अवघ्या ५१ चेंडूंमध्ये सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली होती. तर डेरील मिचेलने अवघ्या ३६ चेंडूंमध्ये ५८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर, मिडलसेक्स संघाला २० षटक अखेर ७ बाद १७४ धावा करण्यात यश आले होते.(Women private part kissed, video went viral on social media)
तसेच या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सरे संघाला विजयासाठी १७५ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना, ओली पोपने ३५ चेंडुंमध्ये नाबाद ५२ धावांची खेळी केली होती. तर सलामी फलंदाज विल जॅक्सने २६ धावांमध्ये ४७ धावांचे योगदान दिले होते. सरे संघाने हे आव्हान १९ व्या षटकात ५ गडी शिल्लक असतानाच पूर्ण केले. ओली पोपच्या तुफानी खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
https://twitter.com/TheRatboy/status/1408519539860643843?s=19
व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
सामना अगदी निर्णायक क्षणी पोहोचला होता. त्यावेळी कॅमेरामॅनची नजर सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकावर पडली. त्यावेळी एक महिला मागे बसलेल्या आपल्या मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी मागे फिरते. इतक्याच तिच्या बाजूला बसलेला व्यक्ती तिच्या खाजगी भागाला किस करताना दिसून येत आहे. हे विचित्र कृत्य लाईव्ह सामन्यात टीपल्यानंतर हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर क्रिकेट चाहते भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
विराट आणि रोहितच्या नेतृत्त्वपदावरुन भिडले भारत-पाक दिग्गज, पाहा कोणी कोणाला दिला पाठिंबा?
‘टोकियो ऑलिम्पिक म्हटलं की मिल्खा सिंग यांचे नाव येतेच,’ पंतप्रधान मोदींनी काढली फ्लाइंग सिखची आठवण
साताऱ्याच्या पठ्ठ्याचं पंतप्रधान मोदींकडून तोंडभरुन कौतुक! ‘मन की बात’मध्ये सांगितली संघर्षाची गोष्ट






