---Advertisement---

विराट आणि रोहितच्या नेतृत्त्वपदावरुन भिडले भारत-पाक दिग्गज, पाहा कोणी कोणाला दिला पाठिंबा?

On: रविवार, जून 27, 2021 2:59 PM
---Advertisement---

गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांच्यात तुलना केली जात आहे. पण ही तुलना फलंदाजी नव्हे तर नेतृत्वावरुन होत असते. या दोघांपैकी सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण? या मुद्द्यावर नेहमीच चर्चा झाली आहे. परंतु विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर या चर्चेला आणखी जोर आला आहे. ही चर्चा थेट शेजारच्या देशात पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान संघातील दिग्गज खेळाडू या मुद्द्यावर आपले मत मांडत आहेत.

कोहली कर्णधार म्हणून हिट
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनी विराट कोहलीला उत्कृष्ट कर्णधार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, “कोहलीमध्ये मला रिकी पाँटिंगची सावली दिसते. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत झालेल्या पराभवाचे खापर विराटच्या डोक्यावर फोडणे चुकीचे आहे.” (Pakistan stand on Virat Kohli and rohit sharma captaincy, salman butt big statement)

भारतीय संघाचे माजी फलंदाज अंशुमन गायकवाड यांना जेव्हा विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी म्हटले की, “कोहली उत्तम कर्णधार आहे. आता भारतीय संघाच्या कर्णधारपदात फेरबदल करण्याची आवश्यकता नाही.”

विराटपेक्षा रोहित उत्कृष्ट कर्णधार
पाकिस्तान संघाचा माजी फलंदाज सलमान बटने म्हटले की, “वैयक्तिकरीत्या मला असे वाटते की, विराट कोहलीपेक्षा रोहित शर्मा उत्कृष्ट कर्णधार आहे. मी २०१८च्या आशिया चषक स्पर्धेत त्याला नेतृत्व करताना पाहिले आहे. ज्याप्रकारे मैदानात उभा राहून त्याने निर्णय घेतले, ते खरच उत्कृष्ट होते. तसेच विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ५ वर्ष अव्वल क्रमांकावर राहिला आहे. परंतु जेव्हा मोठे सामने खेळण्याची वेळ येते तेव्हा भारतीय संघ अपयशी ठरला आहे. त्यामुळे लोक प्रश्न उपस्थित करणारच.”

आयपीएल स्पर्धेत  रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस जेतेपद पटकावले आहे. तसेच रोहित शर्मा हा भारतीय मर्यादित षटकांचा उपकर्णधार आहे.

महत्वाच्या बातम्या-

सचिन म्हणतोय, ‘भारताला नांग्या टाकण्यास भाग पाडणारा क्रिकेटर बनेल भावी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू’

बड्या कसोटीपटूकडून लयीत नसलेल्या पुजाराचा बचाव; म्हणे, ‘त्याच्याऐवजी रोहितला बाहेर करा’

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाविरुद्ध षड्यंत्र, पंचांमुळे हुकले ‘या’ खेळाडूचे शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---