---Advertisement---

होळीच्या रंगात रंगणे एलिस पेरीला पडले महागात; केसांचा रंग बदलताच म्हणाली, ‘मी केस दोन वेळा…’

On: बुधवार, मार्च 8, 2023 3:58 PM
Ellyse-Perry
---Advertisement---

महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या दोन संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या फ्रँचायझीचाही समावेश आहे. स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील आरसीबी संघ या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. अशात रंगाचा सण होळीमध्ये आरसीबीचा संपूर्ण संघ रंगला. यादरम्यान खेळाडूंनी एकमेकांना रंग लावला आहे. हा सण परदेशी खेळाडूंसाठीही यादगार ठरला. मात्र, संघाची स्टार परदेशी खेळाडू एलिस पेरी हिला रंगाचा सण जरा महागात पडला आहे. कारण, गुलाबी रंग तिच्या केसांवरून जातच नाहीये.

खरं तर, महिला आरसीबी (RCB) संघाची स्टार परदेशी खेळाडू एलिस पेरी (Ellyse Perry) हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिच्या सोनेरी केसांना लागलेला गुलाबी रंग जात नाहीये. त्यामुळे ती भलतीच चिंतेत असल्याचे दिसत आहे. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी विचार करत होते की, हे कायम असेच राहणार आहे का? कारण, मी माझे केस दोन वेळा धुतले आहेत.”

Ellyse-Perry-Insta
Photo Courtesy: Instagram/Ellyse Perry

एलिस पेरीच्या मदतीला आरसीबी संघाची खेळाडू हीथर नाईटदेखील धावली आहे. तिनेही तिच्या मदतीसाठी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

https://twitter.com/Heatherknight55/status/1633130578890608645?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1633130578890608645%7Ctwgr%5E2fc2ddf20cc94b8c0970cab2b3ed9905b02b5268%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.insidesport.in%2Fcricket-news%2Fwomens-premier-league-2023%2Fwpl-2023-rcb-star-player-ellyse-perry-pink-color-is-not-getting-removed-from-her-hair-she-says-i-washed-my-hair-twice-530444%2F

महिला आरसीबी संघाने महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. मात्र, यादरम्यानच होळीचा सण आला. त्यानंतर कर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि तिच्या संघाने या सणाचे निमित्त साधून एकच जल्लोष केला. यावेळी मंधाना ऋचा घोष आणि हीथर नाईटसोबत दिसत आहे. याव्यतिरिक्त सोफी डिवाईननेही होळी सणाची मजा लुटली आहे.

https://www.instagram.com/p/Cpe_ebshFDD/

दुसरीकडे, स्पर्धेबाबत बोलायचं झालं, तर आरसीबी संघ सुरुवातीच्या दोन पराभवानंतर गुणतालिकेत चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे. अशात संघाचा पुढील सामना गुजरात जायंट्सविरुद्ध बुधवारी (दि. 8 मार्च) होणार आहे. डब्ल्यूपीएल (WPL) स्पर्धा वेगाने पुढे जात आहे. मात्र, आता आरसीबीला ट्रॉफी जिंकायची असेल, तर पुढील सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन करावे लागणार आहे. (womens premier league 2023 rcb cricketer ellyse perry color is not getting removed from her hair she says i washed my hair twice)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बाबा, तुम्ही चांगलं केलंय…’, सर विवियन रिचर्ड्स यांच्या वाढदिवशी लेक मसाबाची पोस्ट तुफान व्हायरल
ओपनिंग पार्टनर म्हणून पेरीने विराट अन् धोनीमध्ये कुणाला निवडले? म्हणाली, ‘मला लय मजा येईल…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---