---Advertisement---

मुंबईविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर स्मृती मानधना भावूक, मैदानावर अश्रू आवरले नाहीत; पाहा व्हिडिओ

---Advertisement---

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शुक्रवारी (15 मार्च) गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून प्रथमच महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बंगळुरूनं मुंबईवर 5 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात स्टार खेळाडू स्मृती मानधना विशेष काही करू शकली नाही. ती केवळ 10 धावा करून बाद झाली. बाद झाल्यानंतर स्मृती खूप निराश दिसत होती. मात्र आरसीबीनं विजय मिळवल्यानंतर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. विजयानंतर स्मृतींनं श्रेयंका पाटीलला मिठी मारली. यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू दिसले. तर संपूर्ण सामन्यादरम्यान आकर्षणाचं केंद्र राहिलेल्या एलिस पॅरीनंही तिला घट्ट मिठी मारली. स्मृती मानधना विजयानंतर मैदानावर भावूक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डब्ल्यूपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केल्याचा आनंद आरसीबीच्या डगआऊटमध्येही स्पष्ट दिसत होता. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनं एकमेकांना मिठी मारून आनंद साजरा केला. याशिवाय मैदानावरील चाहत्यांनीही आरसीबीच्या विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमचं वातावरण पाहण्यासारखं होतं.

 

स्मृतीनं महिला प्रीमियर लीग 2024 च्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. सध्या ती सर्वाधिक धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. स्मृतीच्या नावे 9 सामन्यात 269 धावा आहेत. मात्र एलिमिनेटर सामन्यात ती 7 चेंडूत 10 धावा करून बाद झाली. स्मृती बाद झाल्यानंतर श्रेयंका पाटील आणि सहकारी खेळाडूंनी संघाला विजयापर्यंत नेलं.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. एक वेळ आरसीबीची धावसंख्या 9.1 षटकात 4 विकेट गमावून 49 धावा अशी केविलवाणी होती. इथून ॲलिस पॅरीनं सामना पलटवला. तिनं 50 चेंडूत 8 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकाराच्या मदतीनं 66 धावांची खेळी केली. तिच्या फलंदाजीच्या जोरावर आरसीबीनं 135 धावांपर्यंत मजल मारली.

136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. संघानं 8व्या षटकात 50 धावांचा टप्पा पार केला. मात्र त्यानंतर यास्तिका भाटिया आणि नॅट सायव्हर-ब्रंट एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर सर्व दडपण कर्णधार हरमनप्रीत कौरवर आलं. यानंतर हरमननं एमिलिया कारसोबत 52 धावांची भागीदारी करत संघाला 120 धावांपर्यंत नेले. मात्र मुंबईला अखेरच्या 2 षटकांत केवळ 10 धावा करता आल्या. अशाप्रकारे आरसीबीनं हा सामना 5 धावांनी जिंकला. आता अंतिम सामन्यात त्यांचा मुकाबला दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महेंद्रसिंंह धोनीनंतर कोण होणार चेन्नईचा पुढील कर्णधार? ‘हे’ खेळाडू आहे शर्यतीत

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! टी 20 विश्वचषकातील भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर

‘चोराच्या उलट्या बोंबा’…बॉल ग्लोव्हजवर आदळताच अंपायरनं धावा कापल्या, मोहम्मद रिझवाननं रागाच्या भरात केलं असं काही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---