न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक खेळला जात आहे. सोमवारी (१४ मार्च) दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या महिला संघांमध्ये विश्वचषकाचा १३ वा सामना खेळला गेला. इंग्लंड संघाला या सामन्यात पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाला अजून एक विजय मिळला आहे. दक्षिण अफ्रिकेने तीन विकेट्स शिल्लक ठेऊन हा विजय मिळवला आहे.
आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (Womens World Cup 2022) मध्ये दक्षिण अफ्रिकेकडून इंग्लंड संघाला मिळालेला हा सलग तिसरा पराभवाचा धक्का आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १२ धावांनी इंग्लंडचा पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला वेस्ट इंडीजकडून ७ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आता या तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडचा विजय हुकला.
दक्षिण अफ्रिका संघाने अगदी शेवटच्या षटकात बाजी मारली. दुसरीकडे दक्षिण अफ्रिका संघाने त्यांची विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. दक्षिण अफ्रिका संघाने स्पर्धेतील त्यांचे पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. यादरम्यान अफ्रिका संघाने बांगलादेश, पाकिस्तान आणि आता इंग्लंडला धूळ चारली आहे.
Marizanne Kapp: 5⃣-fer 🔥
Laura Wolvaardt's sensational fight back 💪South Africa closed a nail-biting victory against England by 3 wickets.#CWC22 pic.twitter.com/3nGODSUDks
— Women’s CricZone (@WomensCricZone) March 14, 2022
दक्षिण आफ्रिकेची मारिझान कॅप ठरली सामनावीर
इंग्लंडच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरली दक्षिण अफ्रिकेची मारिझान कॅप (Marizanne Kapp). तिने सामन्यात एकूण १० षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये ४५ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर या अष्टपैलू खेळाडूने गरजेच्या वेळी दक्षिण आफ्रिका संघासाठी महत्वाच्या ३२ धावाही केल्या. या अप्रतिम प्रदर्शनासाठी मारिझानला सामनावीर निवडले गेले.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ९ विकेट्सच्या नुकसानावर २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाची सलामीवीर फलंदाज लिजीली ली फक्त ९ धावा करून तंबूत परतली. परंतु लॉरा वॉलवर्ड्ट आणि ताजमिन ब्रिट्स यांनी ५६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली आणि संघाला पुन्हा प्रवाहात घेऊन आली. त्यानंतर वॉलवार्ड्टने लुससोबत मिळून महत्वाच्या ७३ धावा केल्या.
सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असला, तरी त्यांची फिरकी गोलंदाज सोफी एकलस्टोन आणि आन्या श्रबसोल यांनी संघासाठी किफायतशीर गोलंदाजी केले. परिणामी दक्षिण अफ्रिकेला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत खेळावे लागले. शेवटच्या षटकात दक्षिण अफ्रिका संघाला विजयासाठी ४ धावांची आवश्यकता होती आणि चार चेंडू शिल्लक ठेऊन संघाने विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या –
‘प्रेम केसांमध्ये आहे’, गुलाबी रंगात केस रंगवत हेटमायरनं राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांचं जिंकलं काळीज
जागतिक कसोटी चँपियनशीप: ‘पंचका’मुळे बुमराह बनला नंबर १, पंतचीही प्रगती; पण विराट- रोहितचं नुकसान
Photo | भारत आणि लंकेचे खेळाडू मैदानावर उतरताच मधमाशांनी केला ‘एअरस्ट्राईक’ आणि नंतर…