---Advertisement---

‘या’ क्लबकडून खेळताना दिसणार मेस्सी? कराराचा आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

On: गुरूवार, जून 1, 2023 5:41 PM
Lionel-Messi
---Advertisement---

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी क्लब फुटबॉलमधील लोकप्रिय फ्रेंच क्लब पॅरिस सेंट-जर्मेनकडून खेळताना दिसून येतो. बार्सिलोना नंतर 2021 मध्ये तो या क्लबमध्ये सामील झाला होता. यावेळीही मेस्सी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण कोणतेही ध्येय किंवा पुरस्कार नसून त्याचे हस्तांतरण आहे. सौदीचे क्रीडा मंत्री अब्दुल अझीझ बिन तुर्की अल-फैसल यांनी या कराराबाबतची संकेत दिले आहेत.

अब्जो रुपयांमध्ये ठरला करार
लिओनेल मेस्सी (Lionel Messi) सौदी अरेबियातील एका क्लबसोबत मोठा करार करण्याची शक्यता आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार आणि विश्वचषक विजेता लिओनेल मेस्सी (Argentine star footballer Lionel Messi) अल हिलाल (Al Hilal) क्लबसोबत 522 दशलक्ष युरोचा करार करणार असल्याचे बोलले जात आहे. ही रक्कम भारतीय चलनात पाहायची झाली, तर अल-हिलालने मेस्सीसमोर 4 अब्ज 70 कोटींची ऑफर ठेवली आहे.

आमने-सामने येणार मेसी-रोनाल्डो
या हालचालीमुळे मेस्सीची पुन्हा एकदा टक्कर ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबत (Cristiano Ronaldo) पाहायला मिळणार आहे. जो सध्या अल हिलालच्या प्रतिस्पर्धी क्लब अल नसीरकडून खेळतो. (Barcelona) पुन्हा एकदा जुन्या काळाप्रमाणे दोघांमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळणार आहे. (football latest news)

संपूर्ण कारकीर्दीत 800हून अधिक गोल
लिओनल मेस्सी (Lionel Messi) हा 800 गोल करणारा दुसरा फुटबॉलपटू आहे. त्याच्या आधी ख्रिस्तियानो रोनाल्डो हा असा एकमेव फुटबॉलपटू होता, ज्याने आपल्या कारकीर्दीत 800 गोल मारले होते. रोनाल्डोचे सध्या एकूण 830 गोल्स आहेत. तसेच, रोनाल्डो हा 5 वेगवेगळ्या विश्वचषकात गोल करणारा एकमेव फुटबॉलपटूही आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऍस्पायर चषक फुटबॉल स्पर्धेत सिटी एफसी अन् सनी डेज संघांची आगेकूच
रवी शास्त्रींनी व्यक्त केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भविष्याबाबत चिंता, म्हणाले, “फुटबॉलसारख्या लीग…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---