दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअम विश्वचषक 2023 स्पर्धेतील 9व्या सामन्याचा साक्षीदार ठरलं. या सामन्यात भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने होते. या एकतर्फी सामन्यात भारताने 8 विकेट्सने जबरदस्त विजय साकारला. यासह भारताने सलग दुसरा सामना जिंकत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात भारतीय चाहते स्टेडिअममध्ये एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.
एकमेकांशी भिडले चाहते
कोणत्याही सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये भांडण होणे, ही नवीन गोष्ट नाही. नेहमी सोशल मीडियावर स्टेडिअममध्ये चाहते भिडल्याची चर्चा रंगलेली असते. अशात भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) सामन्यादरम्यान अरुण जेटली स्टेडिअममध्ये (Arun Jaitley Stadium) उपस्थित भारतीय चाहते वाईटरीत्या भांडले. त्यांच्यातील विषय इतका वाढला की, भांडण हातापाईपर्यंत पोहोचले. यावेळी ते एकमेकांना शिवीगाळ करतानाही दिसले.
Lafda bhi ho gya pic.twitter.com/qFSm6dufCr
— KUNAL DABAS (@kunaldabas_) October 11, 2023
चाहत्यांचे वेगवेगळे तर्क
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच, चाहत्यांनी वेगवेगळे तर्क लावायला सुरुवात केली. एकाने म्हटले की, “रोहितच्या शतकानंतर विराटचे चाहते भांडू लागले.” दुसऱ्या एकाने म्हटले की, “मला वाटतंय, धोनीचे आणि विराटचे चाहते भिडले.” एक जण असेही म्हणाला की, “कोहली-नवीन नाही, तर इतर कुणीतरी सामन्यात भांडण केले.”
Kohli fan fighting after Rohit Sharma century 😭
— Amit 𝕏 (@AMITZZZ_) October 11, 2023
I think Dhoni fans vs Virat fans lag gaye 😅
— khan_julfuquar_94 (@94Julfuquar) October 12, 2023
Kohli – Navin naa sahi, kisi ne to lafda kiya match mein…!! pic.twitter.com/socLxJtecT
— Kartikay Pandey 🇮🇳 (@pandey_kartikay) October 12, 2023
सामन्याचा आढावा
या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी यावेळी 8 विकेट्स गमावत 272 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने कर्णधार रोहित शर्मा याच्या 131 धावा आणि विराट कोहली याच्या नाबाद 55 धावांच्या जोरावर आव्हान सहजरीत्या 35 षटकात गाठले. तसेच, 8 विकेट्सने दणदणीत विजय साकारला. या विजयामुळे भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. भारताचा नेट रनरेट +1.500 इतका झाला. (world cup 2023 fight between fans during india afghanistan match see video here)
हेही वाचा-
अफगाणिस्तानविरुद्ध 4 विकेट्स घेणारा बुमराह स्वत:च्या प्रदर्शनावर नाही खुश, कारण घ्या जाणून
भारताचा नादच खुळा! एकतर्फी विजयानंतर बदलून टाकल्या Points Tableच्या जागा, पाकिस्तानचं केलं मोठं नुकसान