विश्वचषक 2023 स्पर्धेत पराभवाची हॅट्रिक करणाऱ्या पाकिस्तान संघावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. आधी वसीम अक्रम याने खेळाडूंच्या फिटनेसवरून ताशेरे ओढले होते. आता त्यानंतर संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक यानेही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्याने बाबर आझम याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याने असेही म्हटले आहे की, ‘बाबर आजम कोणत्या प्रकारचा अव्वल फलंदाज आहे, ज्याला सरळ षटकारही मारता येत नाही.’
खरं तर, बाबर आझम (Babar Azam) या विश्वचषकात अद्याप तितके चांगले प्रदर्शन करू शकला नाहीये. त्याने धावा केल्या, पण मोठी खेळी खेळून संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात बाबर आझम याने 92 चेंडत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 74 धावा केल्या होत्या. त्याला यावेळी नूर अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन तंबूचा रस्ता पकडावा लागला होता.
काय म्हणाला रज्जाक?
अशात बाबरच्या फलंदाजीविषयी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू अब्दुल रज्जाक (Abdul Razzaq) याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जिओ न्यूजशी बोलताना रज्जाक म्हणाला, “आपले जितके लोक आहेत, ते म्हणतात की, बाबर आझम अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. मी तर आधीच म्हणालो होतो की, हा कुठल्या अव्वलस्थानाचा फलंदाज आहे, ज्याला सरळ षटकारही मारता येत नाही.”
पुढे बोलताना रज्जाक म्हणाला, “बाबर आझम ज्याप्रकारे बाद झाला आहे, जर त्याच्या शरीराचे संतुलन तपासले आणि तो शॉट तपासला, तर पुढे गोलंदाज कोण आहे नूर अहमद, जो त्याचे पदार्पणाचा सामना खेळत आहे. तो बाद होणारा चेंडू नव्हता. खेळात एका-एका चेंडूचे खूप महत्त्व असते. 92 चेंडूत तुम्ही 74 धावा केल्या आहेत आणि या 3 षटकांचे अंतर घेऊन आम्ही बसलो आहोत. जर हेच तीन षटके इफ्तिखार किंवा शादाबने अखेरीस खेळले असते, तर आपण जास्त धावा करू शकलो असतो.”
खरं तर, स्ट्राईक रेट घेण्यासाठी बाबर आझम याची अनेकदा टीका झाली आहे. तसेच, रज्जाक याने त्याच्या स्ट्राईक रेटवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशात पाकिस्तानचा पुढील सामना 27 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यात बाबरच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. (world cup 2023 former cricketer abdul razzaq slams babar azam for slow innings)
हेही वाचा-
ICC ODI Rankigns: भारतीय त्रिकुट गाजवतंय वनडे रँकिंग, बाबरचा पत्ता लवकरच होऊ शकतो कट
ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, एका बदलासह विजयाच्या हॅट्रिकसाठी तयार; स्कॉटसेनेत कोणताच बदल नाही, Playing XI