आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघ सतत निराशाजनक प्रदर्शन करत आहे. नुकत्याच विश्वचषकातील 26व्या सामन्यात त्यांना चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1 विकेटने पराभव पत्करावा लागला. हा त्यांचा सलग चौथा पराभव होता. या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने पाकिस्तानची पुन्हा एकदा खिल्ली उडवली. चला तर, तो काय म्हणाला जाणून घेऊयात…
झाले असे की, भारतीय (Team India) संघाविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तान (Pakistan) संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी पाकिस्तानचे क्रिकेट संचालक मिकी आर्थर (Mickey Arthur) यांनी बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते की, “हा आयसीसीचा नाही, तर बीसीसीआयचा इव्हेंट वाटत होता.” त्यांनी यावेळी असेही म्हटले होते की, “मी स्टेडिअममध्ये दिल दिल पाकिस्तान गाणे वाजतानाही ऐकले नाही. ही गोष्ट मोठी भूमिका बजावते.” त्यावेळी या विधानामुळे आर्थर यांच्यावर सडकून टीका झाली होती.
मायकल वॉन काय म्हणाले?
अशात मायकल वॉन (Michael Vaughan) यांनी मिकी आर्थर यांच्या त्याच विधानावर टीकास्त्र डागले. त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट करत लिहिले की, “हे ऐकून चांगले वाटले की, चेन्नईत आज दिल-दिल पाकिस्तान गाणे वाजवले गेले.” अशात ही पोस्ट व्हायरल होत आहे.
Great to hear ‘Dil Dil’ Pakistan being played in Chennai today 👍 #CWC2023
— Michael Vaughan (@MichaelVaughan) October 27, 2023
सामन्यात काय घडलं?
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 46.4 षटकात सर्व विकेट्स गमावत 270 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 47.2 षटकात 9 विकेट्स गमावत 271 धावा केल्या. एकेवेळी दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाच्या 260 धावांवर 9 विकेट्स पडल्या होत्या, तेव्हा असे वाटले होते की, पाकिस्तान हा सामना सहजरीत्या जिंकेल. मात्र, अखेरीस दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला. या पराभवानंतर आता पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. (world cup 2023 great to hear dil dil pakistan in chennai says this former captain)
हेही वाचा-
मॅक्सवेलने मारला World Cup 2023चा सर्वात लांब षटकार, तुटला ‘या’ भारतीयाचा रेकॉर्ड, पाहा अफलातून व्हिडिओ
ट्रेविस हेडने रचला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला चौथा खेळाडू