भारतीय संघाने आपल्या मागील सामन्यात गत-उपविजेत्या न्यूझीलंड संघाचा 4 विकेट्सने पराभव केला होता. यानंतर आता भारतापुढे सहाव्या सामन्यात इंग्लंडचे आव्हान आहे. भारत विरुद्ध इंग्लंड संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 29वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. यापूर्वी आपण सामन्याविषयी, खेळपट्टीविषयी आणि आकडेवारीविषयी जाणून घेऊयात…
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार प्रदर्शन केले आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. पाच सामने खेळताना भारताने पाच विजय मिळवले आहेत. या विजयासह भारतीय संघ 10 गुणांसोबत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. दुसरीकडे, इंग्लंड संघाची स्थिती खूपच खराब आहे. ते पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहेत. अशात जोस बटलर (Jos Buttler) याच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ कोणत्याही परिस्थितीत भारताविरुद्ध विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
इकाना स्टेडिअमची खेळपट्टी
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) संघातील सामना लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. लखनऊच्या या मैदानावर फिरकीपटूंचा बोलबाला असतो. चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो आणि फलंदाजांना धावा बनवण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागतो. मात्र, या विश्वचषकात खेळपट्टीतून फलंदाजांना मदत मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघातील सामन्यातही फिरकीपटूंची जादू पाहायली मिळाली होती.
आकडेवारी काय सांगते?
लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर आतापर्यंत 12 वनडे सामन्यांचे आयोजन झाले आहे. यामधील 3 सामने प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. तसेच, आव्हानाचा पाठलाग करणारा संघ 9 सामने जिंकला आहे. म्हणजेच सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या सामन्यात दवही खूपच महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या मैदानावरील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 229 राहिली आहे, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 213 राहिली आहे.
अश्विनची संघात एन्ट्री
लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये फिरकी गोलंदाजांना चांगली मदत मिळते. अशात इंग्लंडविरुद्ध कर्णधार रोहित 3 फिरकीपटूंसोबत मैदानावर उतरू शकतो. आर अश्विन याची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री नक्की मानली जात आहे. अश्विन जर अंतिम अकरामध्ये परतला, तर मोहम्मद शमी किंवा मोहम्मद सिराज यांपैकी एकाला बाकावर बसावे लागू शकते. शमीने अखेरच्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याचा फॉर्म पाहता सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते. (world cup 2023 ind vs eng pitch report ekana cricket stadium lucknow rohit sharma know all about match)
हेही वाचा-
टॉस जिंकत पााकिस्तानने घेतली बॅटिंग, दोघांना डच्चू, आफ्रिका संघात बावुमाचे पुनरागमन, तब्बल ‘एवढे’ बदल
‘शाहिद आफ्रिदीने माझ्यावर इस्लाम धर्म…’, माजी पाकिस्तानी खेळाडूचा धक्कादायक आरोप