धरमशाला येथे रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेत सुपरफॉर्मात असलेले दोन बलाढ्य संघ भिडणार आहेत. ते संघ इतर कोणते नसून भारत आणि न्यूझीलंड हे आहेत. मात्र, या सामन्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला संघाच्या तयारी आणि स्पर्धेशी संबंधित प्रश्न विचारले गेले. यावेळी महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये अहमदाबाद आणि चेन्नईतील खेळपट्टीविषयीदेखील एक प्रश्न होता, ज्यावर द्रविड भडकला आणि त्याने मोठे विधान केले.
खरं तर, आयसीसीच्या सामनाधिकाऱ्याने अहमदाबाद (Ahmedabad) आणि चेन्नई (Chennai) येथील खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिली आहे. या सामन्यांमध्ये भारतीय संघाने चेन्नईत ऑस्ट्रेलिया आणि अहमदाबादमध्ये पाकिस्तानला मात दिली होती. या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग मिळाल्याविषयी राहुल द्रविड म्हणाला की, “जर तुम्हाला 350 धावांच्या खेळपट्ट्यांना चांगले म्हणायचे असेल, तर मी याच्याशी असहमत आहे. तुम्हाला वनडे क्रिकेटमध्ये वेगवेगळे कौशल्य दाखवावे लागते. जर तुम्हाला फक्त चौकार आणि षटकार पाहायचे असतील, तर त्यासाठी टी20 क्रिकेट आहे. आपल्याला बाकी गोष्टींची काय गरज आहे?”
द्रविडने फिरकीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या खेळपट्ट्या आणि गोलंदाजांची बाजू घेत म्हटले की, “350 धावांच्या खेळपट्टीवर वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य दाखवावे लागते, जे त्या दिवशी योग्य आहे. मात्र, सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये फिरकीसाठी उपयुक्त खेळपट्टी मिळाल्यावर गोलंदाजांना मदत मिळाली, तर तुम्ही त्याला सरासरी रेटिंग देत आहात. गोलंदाजांसाठी काय राहील मग? ते इथे का येतात? दोन टी20 सामने खेळा बास. आपल्याला एक योग्य मार्ग शोधावा लागेल, जिथे खेळपट्ट्यांना चांगल्या आणि सरासरी म्हटल्या पाहिजेत.”
पुढे उदाहरण देत खेळपट्ट्यांविषयी द्रविड म्हणाला की, “आम्ही दिल्ली आणि पुण्यात दोन चांगल्या खेळपट्ट्यांवर खेळलो, ज्या 350 धावांच्या खेळपट्टी होत्या. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये वेगवेगळे कौशल्य दाखवावे लागते. जसे की, स्ट्राईक रोटेट करणे आणि फिरकी गोलंदाजांचा सामना करणे. जडेजा, सँटनर आणि झम्पाला पाहणे चांगले वाटते की, विलियम्सन, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी स्ट्राईक रोटेट करणे?”
द्रविडने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याविषयीदेखील भाष्य केले आहे. कारण हार्दिक पंड्या याला दुखापत झाल्यामुळे तो धरमशालेत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसेल. अशात कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (world cup 2023 indian coach rahul dravid disagrees with average rating given to ahmedabad and chennai pitches know why)
हेही वाचा-
भारतीय संघात होणार मोठे बदल, खुद्द द्रविडने दिले संकेत; म्हणाला, ‘हार्दिकच्या दुखापतीने बिघडले…’
दुष्काळात तेरावा महिना! दारुण पराभवानंतर इंग्लंडचे Points Tableमध्ये नुकसान, गेला दुबळ्या संघांच्याही खाली