वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 17वा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. विराट कोहली याच्या शतकामुळे भारताने हा सामना सहजरीत्या खिशात घातला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. हा भारताचा विश्वचषकातील सलग चौथा विजय ठरला. चला तर, या सामन्यानंतर विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये काय बदल झाला हे पाहूयात.
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचा हा निर्णय भारतीय खेळाडूंनी सपशेल चुकीचा ठरवला. त्यांनी यावेळी निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 256 धावा केल्या. यावेळी भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स, तर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले.
यानंतर भारताने 257 धावांचे आव्हान 41.3 षटकात 3 विकेट्स गमावत 261 धावा करून पार केले. यावेळी विराट कोहली याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. विराटने या सामन्यात 97 चेंडूंचा सामना करताना 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 103 धावांची शतकी खेळी केली. हे त्याचे वनडे कारकीर्दीतील 48वे शतक ठरले.
भारत पॉईंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?
विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबल (World Cup 2023 Points Table) पाहायचा झाला, तर त्यात अव्वलस्थानी न्यूझीलंड संघ आहे. त्यांनी स्पर्धेत खेळलेले पहिले चारही सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचे 8 गुण आहेत. दुसरीकडे, भारतानेही 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताचेही 8 गुण आहेत. मात्र, भारत पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. यामागील कारण म्हणजे, न्यूझीलंडचा नेट रनरेट (+1.923) हा भारताच्या नेट रनरेटपेक्षा (+1.659) जास्त आहे.
Points Table update #CWC23
If Australia 🇦🇺 wins today they replace Pakistan 🇵🇰 and come at no. 4#PAKvsAUS #AUSvsPAK #BabarAzam𓃵 #Starc #ViratKohli #VirenderSehwag #Umpire#CricketWorldCup2023 pic.twitter.com/NvBuAeXQC3
— SportsPundit (@_SportsPundit) October 20, 2023
यानंतर 4 गुणांसह दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, 3 सामन्यात 4 गुण मिळवत पाकिस्तान चौथ्या स्थानी आहे. इंग्लंडने 3 पैकी 2 सामने गमावले आहेत, त्यामुळे ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत. भारताविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर बांगलादेश संघ सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानी घसरला आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया सहाव्या स्थानी पोहोचला आहे. नेदरलँड्स संघ आठव्या स्थानी, तर अफगाणिस्तान नवव्या आणि श्रीलंका 10व्या स्थानी आहे.
अशात, शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) होणाऱ्या 18व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, तर ते पाकिस्तानची चौथ्या क्रमांकाची जागा घेऊ शकतात. (world cup 2023 new zealand on top spot in latest points table india on second rank after ind vs ban match)
हेही वाचा-
विराटचा पुण्यातील अनोखा कारनामा वर्षोनुवर्षे राहील आठवणीत, दिग्गजाने फक्त 1 बॉलवर चोपल्या ‘एवढ्या’ धावा
विराटच्या शतकासाठी अंपायरने केला मोठा गेम, मुद्दाम नाही दिला वाईड बॉल? व्हिडिओ तुफान व्हायरल