विश्वचषक 2023चा पहिला सामना जिंकून न्यूझीलंड संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे, तर दुसरीकडे नेदरलँड संघ आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाला आहे. अशात न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड संघात त्यांचा दुसरा आणि स्पर्धेतील सहावा सामना सोमवारी (दि. 09 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. हा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे पार पडेल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. चला तर या सामन्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात…
स्पर्धेतील कामगिरी
गत-उपविजेता बलाढ्य न्यूझीलंड संघ उद्घाटनाच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंड संघावर भारी पडला. त्यांनी इंग्लंडचा 9 विकेट्सने पराभव केला होता. या विजयासह त्यांनी जबरदस्त गुण मिळवत गुणतालिकेतील पहिले स्थान काबिज केले. दुसरीकडे, स्पर्धेचा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड संघात खेळला गेला. या सामन्यात नेदरलँड संघाला 81 धावांनी पराभवाचा धक्का बसला होता.
अशात न्यूझीलंड आणि नेदरलँड संघ विश्वचषकातील सहाव्या सामन्यात आमने-सामने असतील. आतापर्यंत उभय संघ वनडे क्रिकेटमध्ये 4 वेळा आमने-सामने आले आहेत. या प्रत्येक सामन्यात न्यूझीलंडने नेदरलँडला पराभवाचं पाणी पाजलं आहे.
कोणाचे पारडे जड?
उभय संघांचा विश्वचषकातील सध्याचा फॉर्म आणि दोन्ही संघांची आमने-सामने आकडेवारी पाहिली, तर न्यूझीलंड संघाचे पारडे जड असल्याचे दिसते. वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघ नेदरलँडला पाचव्यांदा पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, आता या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे रंजक ठरेल.
खेळपट्टीची माहिती
खरं तर, हैदराबाद येथील राजीव गांध आंतरराष्ट्रीय स्टेडिअम फलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. या मैदानावर फलंदाज सहजरीत्या धावांचा पाऊस पाडता. मात्र, या व्यतिरिक्त खेळपट्टीतून गोलंदाजांनाही फायदा मिळतो. विशेषत: फिरकी गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी फायदेशीर आहे. पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड संघातील सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाने याच मैदानावर 49 षटकात 286 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला नेदरलँड संघ 41 षटकात 205 धावांवर सर्वबाद झाला होता. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी 6 विकेट्स, तर शादाब खानसह फिरकीपटूंनी 4 फलंदाजांना बाद केले होते.
अशात, न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड संघातील सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असतील. (world cup 2023 new zealand vs netherlands pitch report know here)
विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी उभय संघ
न्यूझीलंड
केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टीम साऊदी, विल यंग.
नेदरलँड्स
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डौड, बास डी लीड, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सीब्रँड एंजेलब्रेच.
हेही वाचा-
‘शेवटच्या चेंडूवर षटकार मारायचा नव्हता’, विजयानंतर राहुलने स्वतः केले मान्य
“मी शॉवर घेऊन आलो आणि…”, मॅचविनिंग खेळीनंतर राहुलचा मोठा रहस्यभेद





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा