वनडे विश्वचषक स्पर्धेत जेव्हाही सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची चर्चा होईल, तेव्हा त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याचे नाव आल्याशिवाय राहणार नाही. मॅकग्राच्या नावाशिवाय ती यादी पूर्ण होऊच शकणार नाही. यामागील कारण म्हणजे, मॅकग्रा हा विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्याच्या नावावर विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. अशात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला अवघे काही दिवस उरले आहेत. या निमित्ताने आपण त्याची विश्वचषकातील कामगिरी पाहूयात.
कितीविश्वचषक खेळला?
भेदक गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) याने पहिला वहिला विश्वचषक 1996च्या रूपात खेळला होता. या विश्वचषकात त्याला फक्त 6 विकेट्स घेता आल्या होत्या. यानंतर त्याने 1999, 2003 आणि 2007 या विश्वचषकातही सहभाग नोंदवला. अशाप्रकारे त्याने एकूण चार विश्वचषक खेळले. विशेष म्हणजे, 1999च्या विश्वचषकात त्याने 18 विकेट्स घेऊन संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा धुरंधर
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याची विश्वचषकातील एकूण कामगिरी पाहायची झाली, तर त्याने 39 सामने खेळताना 3.96 इतक्या जबरदस्त इकॉनॉमी रेटने सर्वाधिक 71 विकेट्स घेतल्या आहेत. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये सामील असलेल्या मॅकग्राने एका डावात प्रत्येकी 2 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
त्याची प्रत्येक हंगामातील कामगिरी पाहायची झाली, तर त्याने 1996च्या विश्वचषकात 7 सामन्यात 6 विकेट्स, 1999च्या विश्वचषकात 10 सामन्यात 18 विकेट्स, 2003च्या विश्वचषकात 11 सामन्यात 21 विकेट्स आणि 2007च्या विश्वचषकात 11 सामन्यात सर्वाधिक 26 विकेट्स घेतल्या होत्या. 2007च्या विश्वचषकातील कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2003 आणि 2007च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती.
विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी
मॅकग्रा 2003च्या विश्वचषकात तुफान फॉर्ममध्ये होता. त्याने स्पर्धेतील नामिबिया संघाविरुद्धच्या 10व्या सामन्यात फक्त 7 षटके गोलंदाजी करताना 15 धावा खर्चून सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, त्याच्या 7 षटकांमधील 4 षटके ही निर्धाव होती. ही विश्वचषकातील आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी राहिली आहे. विशेष म्हणजे, नामीबिया संघाचा डाव अवघ्या 45 धावांवर संपुष्टात आला होता आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना 256 धावांनी जिंकला होता.
#ThrowbackThursday Glenn McGrath took the best CWC bowling figures in 2003, an extraordinary 7/15 to help bowl Namibia out for 45 runs pic.twitter.com/0AeXLMZXCE
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 10, 2016
मॅकग्राची वनडे कारकीर्द
ग्लेन मॅकग्रा याच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने ऑस्ट्रेलियाकडून एकूण 250 सामने खेळले आहेत. त्यातील 248 डावांमध्ये त्याने 22.02च्या सरासरीने आणि 3.88च्या इकॉनॉमी रेटने 381 विकेट्स घेतल्या आहेत. यातील 15 धावा खर्चून 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम वनडे कारकीर्द आहे. (world cup 2023 special story Glenn McGrath best bowling figure in a match in WC 2003)
विश्वचषक विशेष-
वर्ल्डकप स्पेशल: World Cupमध्ये सर्वाधिक धावा करणारे Top 10 कर्णधार; यादीत फक्त दोनच भारतीय
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद
किस्से वर्ल्डकपचे: आणि मलिंगाचे ‘ते’ चार चेंडू इतिहासात अजरामर झाले
किस्से वर्ल्डकपचे: गप्टिलचा थ्रो स्टम्पसवर नव्हेतर भारतीयांच्या हृदयावर लागलेला
विश्वचषक कमी, पण शतके जास्त! रोहितचा World Cupमधील भन्नाट Record, 2023मध्ये भीमपराक्रम करण्याची संधी
वर्ल्डकप 2019 मध्ये घडलेले सर्व विक्रम, रोहित-वॉर्नरकडे यावर्षी मोठी संधी
किस्से वर्ल्डकपचे: वर्ल्डकप म्हटलं की 2003 ची फायनल आणि पॉंटिंग डोक्यातून जात नाही
किस्से वर्ल्डकपचे: त्यादिवशी चिन्नास्वामीवर केविन ओब्रायनने इंग्लडला गुडघ्यावर आणलेलं
World Cup 2023 Preview: 10 संघांपासून ते सामन्यांच्या ठिकाणांपर्यंत, सर्व माहिती एकाच क्लिकवर
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा