---Advertisement---

विश्वचषक विजेता भारतीय खेळाडू म्हणतो, धोनीपेक्षा गंभीर भारी कर्णधार

On: गुरूवार, एप्रिल 9, 2020 6:41 PM
---Advertisement---

जेव्हाही क्रिकेट जगतात संघाच्या कर्णधारांची चर्चा होते, तेव्हा भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावाचा उल्लेख नेहमीच होतो. अनेक मोठ-मोठे दिग्गज खेळाडू धोनीला सर्वात यशस्वी कर्णधार समजतात. धोनी भारतीय संघाचा एकमेव कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयसीसीचे ३ विश्वचषक आपल्या नावावर केले आहेत.

परंतु भारतीय संघाचा फलंदाज रॉबिन उथप्पा धोनीला नव्हे तर गौतम गंभीरला (Gautam Gambhir) आपला सर्वात चांगला कर्णधार मानतो. उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात क्रिकेट खेळले आहे. परंतु त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कर्णधार (Best Captain) हा गंभीर आहे.

उथप्पा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघासाठी खेळला होता. या संघाचा कर्णधार गंभीर होता. गंभीरची प्रशंसा करत उथप्पा म्हणाला की, “माझ्यासाठी गंभीर सर्वात चांगला कर्णधार आहे. तो जास्त बोलत नव्हता. परंतु तो जितकी गरज आहे, तितकेच बोलत होता. एक चांगला कर्णधार तुम्हाला संघात चांगली वागणूक देतो. तसेच त्याच्या नेतृत्वाचे परिणाम तुम्ही पाहिलेच आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सने २०१४साली आयपीएलच्या लिलावामध्ये उथप्पाला विकत घेतले होते. या मोसमात त्याने ६६० धावा केल्या होत्या.  उथप्पाने गंभीरच्या नेतृत्वात २०१५, २०१६ आणि २०१७मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे (Kolkata Knight Riders) प्रतिनिधित्व केले आहे. परंतु ज्यावेळी गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सला सोडले, त्यावेळी दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) या संघाचा कर्णधार बनला.

कार्तिकच्या नेतृत्वात उथप्पाने दोन मोसम खेळले. परंतु त्याला कोलकाताने मुक्त केले आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने त्याला ३ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते.

त्याने आयपीएलमध्ये एकूण १७७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २८.८३ च्या सरासरीने ४४११ धावा केल्या आहेत. यामध्ये २४ अर्धशतकांचाही समावेश आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची १ वर्षांची मुलगीही म्हणते, घराबाहेर पडू नका

-कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट बंद! या क्रिकेटपटूंना घर चालवणेही झाले कठीण

-वनडेत ११व्या स्थानी सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---