---Advertisement---

ट्राॅफीची प्रतिक्षा संपली! 17 वर्षांनंतर मुंबईकर होणार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार

On: बुधवार, जुलै 3, 2024 1:04 PM
---Advertisement---

भारतीय संघाने भारतीय क्रिकेट चाहत्यांना दीर्घकाळानंतर आयसीसी ट्राॅफी जिंकण्याचा आनंद दिला. यंदाचे टी20 विश्वचषक जिंकून टीम इंडियाने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन रोहित आणि कंपनी टी20 विश्वविजेता बनले. आता मायदेशी परतल्यानंतर टीम इंडिया चमकदार ट्रॉफीसह खुल्या बसमधून मुंबईचा दौरा करु शकते. यापूर्वी धोनी आणि कंपनीने 2007 टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर ही कामगिरी केली होती.

16 वर्षांपूर्वी, जेव्हा टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी20 विश्वचषक जिंकला तेव्हा धोनीच्या संघाने मुंबईत ट्रॉफीसह बस परेड आयोजित केली होती. 2007 टी20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला, जिथे भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून ट्रॉफी जिंकली होती.

आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात होते की टीम इंडिया 16 वर्षे जुना सीन रिपीट करु शकते. बार्बाडोसहून परतल्यानंतर टीम इंडिया खुल्या बसमधून ट्रॉफीसह मुंबईला भेट देऊ शकते, असे वृत्तात म्हटले आहे. मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 29 जून रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघ टी20 विश्वचषक दुसऱ्यांदा जिंकणारा तिसरा देश ठरला. पण विश्वचषक जिंकताच बार्बाडोस येथे चक्री वादळामुळे संघ बार्बाडोसमध्ये अडकला होता. मात्र, आता टीम इंडिया बीसीसीआयच्या विशेष विमानाने बार्बाडोसहून दिल्लीसाठी रवाना झाली असून गुरुवारी सकाळपर्यंत दिल्लीला पोहोचेल, असे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

महत्तवाच्या बातम्या-

स्वप्न सत्यात उतरलं; झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतर युवा खेळाडूंची पहिली प्रतिक्रिया समोर
“मरणाच्या दारापासून ते टी20 विश्वचषक विजेता”, पाहा रिषभ पंतचा प्रेरणादायी प्रवास
‘टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन भारताचे स्वागत’ झिम्बाब्वे क्रिकेटने केले टीम इंडियाचे खास पद्धतीने कौतुक

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---