---Advertisement---

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत 18 व्या मानांकित कारास्तेवसह अव्वल 100 खेळाडूमधील आठ खेळाडूंचे आकर्षण

On: बुधवार, जानेवारी 5, 2022 6:43 PM
Tata Open Maharashtra
---Advertisement---

पुणे। दक्षिण आशियातील एटीपी टूर स्पर्धांपैकी एक असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या चौथ्या मालिकेत अव्वल 100 खेळाडूंमधील जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानी असलेल्या ऐसलेन केरस्तेव, गतविजेत्या जेरी व्हेसली यासंह अन्य सात खेळाडू एकेरीत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे 31जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.

आशियातील सर्वात जुन्या टेनिस स्पर्धांपैकी एक असलेली ही स्पर्धा 26व्या वर्षात पदार्पण करत असून कोविड- 19च्या महामारीमुळे एक वर्षाच्या विश्रांतीनंतर ही स्पर्धा होत आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेला महाराष्ट्र सरकार यांच्या संलग्नतेने टाटा समूह यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

28 वर्षीय रशियाच्या ऐसलेन केरस्तेवने 2021मध्ये लक्षवेधी कामगिरी केली असून त्याने याआधी ऑस्ट्रेलियाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तसेच, ऐसलेन याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरीत अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोविचला पराभूत करून पहिलेवहिले विजेतेपद पटकावले होते. याशिवाय मिश्र दुहेरीत त्याने रौप्य पदक पटकावले होते. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या डॅनिल मेदवेदेव याच्याकडून एटीपी कप 2021स्पर्धे दरम्यान रशियाचे राखीव अस्त्र म्हणून ओळख मिळालेला कारात्सेव या वेळी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या पदार्पणातच आपली छाप पाडायला उत्सुक असेल.

टाटा ओपन महाराष्ट्र या स्पर्धेचे आयोजन पुन्हा एकदा करत असल्याचे जाहिर करताना आम्हाला आनंद होत आहे. जगभरातील अनेक नामांकित खेळाडू आतापर्यंत या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या वेळे देखिल ही परंपरा कायम राहणार आहे. कोविड 19चे आव्हान असूनही या स्पर्धेत खेळण्यासाठी जगभरातील अनेक प्रमुख खेळाडूंनी खेळण्याची तयारी दर्शविली असल्याचे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वोत्तम दर्जाचे टेनिस पाहायला मिळणार आहे, असे टाटा ओपन महाराष्ट्रचे संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितले.

149 चा कटऑफसह, देशातील प्रमुख एटीपी 250 स्पर्धेत अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूदेखील सहभागी होत असून यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमन, पोर्तुगलचा उत्कृष्ट टेनिसपटू जावो सौसा आणि युवा टेनिसपटू लॉरेंझो मुसेत्ती यांसारखे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. 19 वर्षीय मुसेत्ती याने अव्वल 100च्या खेळाडूंमध्ये प्रवेश केला असून कमी कालावधीत या युवा खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्याने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत स्टेन वावरिंका, ग्रिजॉर दिमित्रोव्ह आणि केई निशिकोरीसारख्या अव्वल 10मध्ये असलेल्या मानांकित खेळाडूंना पराभूत करून आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. तसेच, 32वर्षीय अनुभवी खेळाडू जॉन मिलमनदेखील सहभागी होत आहे. त्याने 2018 मध्ये यूएस ओपन स्पर्धेत दिग्गज खेळाडू रॉजर फेडररवर सनसनाटी विजय मिळवत जागतिक क्रमवारीत अव्वल 50 खेळाडूंच्या यादीत स्थान पटकावले होते.

याशिवाय भारताचा टेनिसपटू युकी भांब्री आपल्या मानांकनाच्या जोरावर मुख्य ड्रॉपासून स्पर्धेला सुरुवात करणार आहे. दुखापतीतुन सावरत युकी हा सध्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठी तयारी करत आहे.

ही स्पर्धा पुन्हा सुरु होण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. यासाठी सर्व भागीदारांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. स्पर्धेचे आयोजन करताना समोर असलेल्या आव्हानांची आम्हाला कल्पना आहे. पण, आम्ही त्यांचा सामना करण्यास समर्थ आहोत. एमएसएलटीएने अलिकडेच काही महत्वाच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे. ही स्पर्धा देखील आम्ही यशस्वी करू याची मला खात्री आहे. संयोजक म्हणून स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व खेळाडू, संघटक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमचे प्राधान्य राहिल. आणखी एका स्पर्धेचे यशस्वी आयोकोविड १९ संदर्भात सरकारने आखून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे आम्ही पालन करु, असे एमएसएलटीएचे सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.

चेक प्रजासत्ताकचा स्टार खेळाडू जेरी व्हेसलीने गतमालिकेत विजेतेपद पटकावले असून यावर्षीदेखील त्याचे कडवे आव्हान प्रतिस्पर्धीपुढे असणार आहे. तसेच, अन्य खेळाडूंमध्ये तिसऱ्या मालिकेतील उपविजेता एगोर जेरासीमोव्ह, रिकार्डस बेरकिस, जागतिक क्रमवारीत 49व्या स्थानी असलेल्या जेम्स डकवर्थ आणि नुकत्याच सिबूइ येथे पार पडलेल्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील विजेता इटलीचा स्टेफनो ट्रॅव्हग्लिया हे खेळाडू सहभागी होणार आहेत. माजी युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील विजेता कामिल माझरेझक, मालदीवच्या एटीपी स्पर्धेतील विजेता राडू अल्बोतांड, जागतिक क्र.62 असलेल्या जियानलुका माजेर यांसारख्या मानांकित खेळाडूंच्या प्रवेशिका आल्या आहेत. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 30 व 31 जानेवारी रोजी होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

पीएमडीटीए मानांकन वरिष्ठ व हौशी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंकित कापसे, नरेश अरोरा, नरेंद्र पवार, अमित शर्मा यांची आगेकूच

चौथ्या अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत टेनिसनट्स, महाराष्ट्र मंडळ, डेक्कन गोल्डन बॉईज संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

ईएमएमटीसी १४ वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मानांकित खेळाडूंना नमवत कर्नाटकच्या तनुष घिलदयाल, एन. हर्षिनी यांना विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---