भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि २२२ धावा शिल्लक ठेऊन मोठा विजय मिळवला. आता उभय संघातील दुसरा सामना १२ मार्चपासून बेंगलोरमध्ये खेळला जाईल, जो डे-नाईट स्वरूपाचा असेल. हा सामना भारताने जिंकला, तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत संघ पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचेल.
सध्या ७७.७७ टक्के गुणांसह ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या भारत-श्रीलंका (IND vs SL Test Series) या कसोटी मालिकेव्यतिरिक्त पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातही कसोटी मालिका खेळली जात आहे. पाकिस्तन-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील (Pakistan vs Australia) पहिला सामना अनिर्णीत राहिला.
सामना जिंकल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत संघाला १२ गुण मिळतात, तर अनिर्णीत झाल्यावर ४ गुण दिले जातात. ऑस्ट्रेलियालाने या हंगामात खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ४ जिंकले आहेत आणि यासाठी त्यांना ५६ गुण मिळाले आहेत, म्हणजेच एकूण विजयाची ७.७७ टक्केवारी आहे. पाकिस्तानला पाच सामन्यांमध्ये ४० गुण मिळाले, म्हणजेच त्यांची ६६.६६ टक्केवारी आहे. गुणतालिकेत त्यांचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या चालू हंगामात श्रीलंका संघाने आतापर्यंत ३ सामने खेळेल आणि त्यातील २ जिंकले. श्रीलंका संघ २४ म्हणजेच एकूण ६६.६६ टक्केवारीसह गुणतालिकत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण अफ्रिका संघाची ५ सामन्यांमध्ये ३६ गुणांसह म्हणजेच एकूण ६० टक्केवारी गुण आहे. दक्षिण अफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर आहे. भारताने खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये ६५ गुण मिळवले आहेत. म्हणजेच संघाची ५४.१६ टक्केवारी आहे.
Here's how things stack up in the #WTC23 table after the drawn #PAKvAUS Test 👀 pic.twitter.com/3a60qlD2n6
— ICC (@ICC) March 8, 2022
आता १२ मार्चपासून भारत आणि पाकिस्तान संघ आपापला पुढचा कसोटी सामना खेळणार आहेत. भारताने जर हा सामना जिंकला, तर श्रीलंका संघाची विजयी टक्केवारी ५० होईल आणि त्यांचा संघ तिसऱ्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर येईल. श्रीलंकेच्या पराभवानंतर दक्षिण अफ्रिका तिसऱ्या, तर भारत चौथ्या क्रमांकावर येईल. त्यानंतर पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पुढचे दोन सामने जर पहिल्या सामन्याप्रमाणेच अनिर्णीत राहिले, तर पाकिस्तानची जिंकण्याची सरासरी ५७.१४ टक्के होईल आणि त्यांचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरेल. अशात भारत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
महत्वाच्या बातम्या –
पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा: माव्हरिक्सची जॅग्वार्सवर मात, सेलर्सचाही रोमहर्षक विजय
अखेर राहुल चहर चढला बोहल्यावर! २२ व्या वर्षी बांधली लग्नगाठ
महिला विश्वचषकात ‘मिताली सेना’ भिडणार यजमान न्यूझीलंडशी; अव्वल स्थानाचे असेल लक्ष