जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा विजेतेपदाचा मान ऑस्ट्रेलिया संघाला मिळाला. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. अशात स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीने गुरुवारी (दि. 15 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25 सायकलचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता तिसऱ्या हंगामाचा किताब पटकावण्यासाठी बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध कडवी झुंज देताना दिसणार आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25 (World Test Championship 2023-2025) सायकलची सुरुवात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिकेने होणार आहे. दुसरीकडे, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर डब्ल्यूटीसी 2025च्या सायकलची सुरुवात वेस्ट इंडिज दौऱ्याने करणार आहे. डब्ल्यूटीसी 2025 स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्स मैदानात पार पडणार असल्याचेही आयसीसीने सांगितलं आहे.
संघ 9 आणि सामने 68
डब्ल्यूटीसी 2025 (WTC 2025) सायकलमध्ये एकूण 9 संघ भाग घेतील. दोन वर्षांच्या कालावधीत या 9 संघांमध्ये एकूण 68 कसोटी सामने खेळले जातील. हे सामने 27 मालिकांमध्ये पार पडणार आहेत. सहभागी 9 संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे.
प्रत्येक डब्ल्यूटीसी मालिका 2 किंवा 5 सामन्यांची असेल. तसेच, प्रत्येक संघ यादरम्यान 6 मालिका खेळेल. यातील 3 मालिका घरच्या मैदानांवर, तर उर्वरित 3 मालिका विरोधी संघाच्या मैदानावर पार पडतील. इंग्लंड संघ या सायकलमध्ये सर्वाधिक 21 कसोटी सामने खेळणार आहे. त्यापाठोपाठ भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी 19 सामने खेळतील.
दुसरीकडे, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघ प्रत्येकी 12 सामने खेळतील. तसेच, पाकिस्तान आणि स्पर्धेच्या उद्घाटनाचा विजयी संघ न्यूझीलंड प्रत्येकी कसोटी 14 सामने खेळतील. याव्यतिरिक्त वेस्ट इंडिज संघ 13 सामन्यात विरोधी संघांना आव्हान देईल. (World Test Championship 2023-2025 cycle revealed India set for thrilling 19 matches know schedule here)
A new cycle begins ????
The #Ashes kick-starts #WTC25!
More ???? https://t.co/GPOgmW9NRs pic.twitter.com/Pv6d9emTbp
— ICC (@ICC) June 15, 2023
भारतीय संघाच्या कसोटी मालिका (19 सामने)
पहिली मालिका- अवे, विरुद्ध वेस्ट इंडिज (2 सामने)
दुसरी मालिका- अवे, विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2 सामने)
तिसरी मालिका- होम, विरुद्ध इंग्लंड (5 सामने)
चौथी मालिका- होम विरुद्ध, बांगलादेश (2 सामने)
चौथी मालिका- होम, विरुद्ध- न्यूझीलंड (3 सामने)
सहावी मालिका- अवे, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया (5 सामने)
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, फुकटात पाहता येणार IND vs WI सामन्यांचा थरार
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यास वृद्धिमान साहाचा स्पष्ट नकार, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक