---Advertisement---

टेस्ट चॅम्पियनशिप : न्यूझीलंड तर फायनलमध्ये पोहचले आता भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासाठी ‘अशी’ आहेत समीकरणे

On: बुधवार, फेब्रुवारी 3, 2021 7:23 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १ ऑगस्ट २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. आता या स्पर्धेतील अगदी मोजक्या मालिका शिल्लक आहेत. विशेष म्हणजे न्यूझीलंड संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेशही केला आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी केवळ १ जागा शिल्लक असल्याने चुरस वाढली आहे. सध्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी ३ संघात स्पर्धा आहे; हे तीन संघ म्हणजे भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया.

याच स्पर्धेमुळे ५ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. ४ सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील निकालावर बरंच काही अवलंबून असणार आहे.

…तर भारत पोहचेल अंतिम सामन्यात –

भारताने जर इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका २-१, २-०, ३-१,३-०, ४-० अशा फरकाने जिंकली तर भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल होऊ शकतो. म्हणजेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताने कमीत कमी २ सामने जिंकून विजय मिळवणे अवश्यक आहे.

अशी आहेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांसाठी समीकरणे –

ऑस्ट्रेलिया सध्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत आणि न्यूझीलंड पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर जरी असले तरी त्यांनाही अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्यांना भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.

जर भारत इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका १-० फरकराने जिंकला किंवा भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवली किंवा भारत जर इंग्लंडविरुद्ध पराभूत झाला तर ऑस्ट्रेलिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

तसेच इंग्लंडचा विचार करता, त्यांना जर कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारताला कसोटी मालिकेत ३-१, ३-० किंवा ४-० अशा फरकाने पराभूत करावे लागणार आहे. म्हणजे त्यांना भारताविरुद्ध कसोटी मालिकेत कमीत कमी ३ सामने जिंकूनच विजय मिळवावा लागणार आहे.

लॉर्ड्सवर होणार अंतिम सामना –

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जून महिन्यात लॉर्डस मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या निर्णयामुळे न्यूझीलंडला अंतिम सामन्याचे तिकीट – 

ऑस्ट्रेलियाने मंगळवारी आपला दक्षिण आफ्रिकेचा नियोजित दौरा रद्द केला. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाची सद्य परिस्थिती बघता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच कारणाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत महत्वाचे बदल झाले.

आता गुणतालिकेत भारतीय संघ पाच मालिकांनंतर १३ सामन्यातील ७१.७ अशा विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी न्यूझीलंडचा संघ पाच मालिकांनंतर ११ सामन्यातील ७०.० अशा विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड यानंतर कोणतीही मालिका खेळणार नाही आहे. त्यामुळे त्यांचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.

गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्याकडे चार मालिकेतील १४ सामन्यात ६९.२ अशी विजयाची टक्केवारी आहे. ऑस्ट्रेलियादेखील या स्पर्धेतील आणखी कसोटी मालिका खेळणार नाही. त्यामुळे त्यांना भारत- इंग्लंड मालिकेवरच अवलंबून रहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“रिषभ पंतचा खेळ पाहून बहुधा हृदयविकाराचा झटकाही येईल”, भारतीय संघाच्या सदस्याचे गमतीशीर विधान

हार्दिकला येतेय वडिलांची आठवण, शेअर केला भावनिक व्हिडिओ

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या ‘या’ तीन खेळाडूंना मिळू शकते आयपीएलचे तिकीट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---