सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 चे चक्र चालू आहे. आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दोन फायनल खेळले गेले आहेत. टीम इंडिया दोन्ही वेळा फायनलमध्ये पोहोचली, मात्र दोन्ही वेळा संघाला पराभवाचा सामना करावा लागला. 2021 मध्ये झालेल्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं तर 2023 मध्ये झालेल्या दुसऱ्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला. आता टीम इंडियाची नजर तिसऱ्या फायनलकडे आहे.
दरम्यान, इंग्लंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या टेबलमध्ये मोठा बदल केला आहे. इंग्लंडच्या सलग दोन विजयांमुळे टीम इंडियाचं नुकसान होणार का? वेस्ट इंडिजच्या सलग दोन पराभवानंतर टीम इंडिया गुणतालिकेत कुठे पोहोचली? ते जाणून घेऊया.
इंग्लंडचे सलग दोन विजय आणि वेस्ट इंडिजचा पराभव यामुळे टीम इंडियाला काहीही फरक पडला नाही. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी सर्वाधिक 68.51 एवढी आहे. सलग दोन कसोटी जिंकूनही इंग्लंड गुणतालिकेत टॉप 5 मधून बाहेर आहे, तर वेस्ट इंडिज 9व्या स्थानावर आहे. इंग्लंडनं आतापर्यंत 12 पैकी 5 कसोटी जिंकल्या आहेत, ज्यात त्यांची विजयाची टक्केवारी 31.25 आहे. तर वेस्ट इंडिजनं आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त 1 सामना जिंकता आला आहे. वेस्ट इंडिजची विजयाची टक्केवारी 22.22 आहे.
या गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल क्रमांकावर आहे. भारतीय संघानं आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 6 जिंकले, 2 हरले आणि 1 अनिर्णित राहिला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियानं 12 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 8 जिंकले आणि 2 गमावले, तर एक सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 62.50 आहे.
तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. किवी संघानं 6 कसोटी खेळल्या आहेत, ज्यात 3 जिंकल्या आणि 3 गमावल्या. न्यूझीलंडची विजयाची टक्केवारी 50 टक्के आहे. त्यानंतर गुणतालिकेत श्रीलंका चौथ्या स्थानावर आहे. संघानं आतापर्यंत 4 कसोटी खेळल्या, ज्यापैकी 2 जिंकल्या आहेत आणि 2 गमावल्या आहेत. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. पाकिस्ताननं 5 कसोटी खेळल्या आहेत, ज्यापैकी 2 जिंकल्या आहेत आणि 3 गमावल्या आहेत. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी 36.66 आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन तेंडुलकरचा शतकांचा रेकॉर्ड धोक्यात? इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा जो रुटबाबत मोठा दावा
विराट कोहलीसोबतच्या नात्यावर गौतम गंभीरची स्फोटक प्रतिक्रिया; म्हणाला, “हे टीआरपीसाठी…”
रवींद्र जडेजाला संघातून वगळलं का? आगरकर म्हणाले, “त्याला निवडण्यात काही अर्थ…”