लंडन। 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना 50-50 षटकानंतर बरोबरीत राहिला आहे. त्यामुळे आता या सामन्यात सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. विश्वचषक इतिहासात होणारी ही पहिलीच सुपर ओव्हर आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी 50 षटकात 242 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडलाही 50 षटकात सर्वबाद 241 धावाच करता आल्या.
या सामन्यात विजयासाठी शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला 1 विकेटची तर इंग्लंडला 2 धावांची गरज होती. यावेळी बेन स्टोक्स आणि मार्क वूड 2 धावा घेण्यासाठी धावला परंतू दुसरी धाव घेताना वूड धावबाद झाला त्यामुळे या सामन्यात बरोबरी झाली.
इंग्लंडकडून 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्टोक्स आणि जॉस बटलर यांनी पाचव्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी करत चांगली झुंज दिली होती. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्यूसन आणि जेम्स निशाम यांनी सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून हेन्री निकोल्सने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच टॉम लॅथमने 47 धावांची, तर विलियम्सनने 30 धावांची महत्त्वपूर्ण छोटीखानी खेळी केली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि लियाम प्लंकेटने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–जो रुटने फलंदाजीत नाही तर आज क्षेत्ररक्षणात केला मोठा विश्वविक्रम
–मैदानात पाऊल ठेवताच केन विलियम्सनचा या दिग्गज कर्णधारांच्या खास यादीत झाला समावेश
–१२ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडत कर्णधार विलियम्सनने रचला मोठा इतिहास