बर्मिंगहॅम। आज(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना पार पडणार आहे. हा सामना एजबस्टर्न स्टेडियमवर होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल.
भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्याच्या इराद्याने उतरेल. तर बांगलादेश उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.
या सामन्यातून भारताच्या काही खेळाडूंना खास विक्रम करण्याची संधी आहे.
आज हे विक्रम करु शकतात भारतीय क्रिकेटपटू –
– विराट कोहलीला 2019 मध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 7 धावांची गरज.
– रोहित शर्माला 2019 मध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 4 धावांची गरज. 2019 मध्ये ऍरॉन फिंच आणि उस्मान ख्वाजा या खेळाडूंनी याआधी 1000 वनडे धावांचा टप्पा पार केला आहे.
– विश्वचषकात 1000 धावा पूर्ण करण्यासाठी विराटला 31 धावांची गरज. आत्तापर्यंत विश्वचषकात 1000 धावांचा टप्पा फक्त सचिन तेंडुलकर(2278) आणि सौरव गांगुली(1006) या भारतीय क्रिकेटपटूंनी पार केला आहे.
– हार्दिक पंड्याला 50 वनडे विकेट्स पूर्ण करण्यासाठी 1 विकेटची गरज.
– हार्दिक पंड्याला कारकिर्दीत 1000 वनडे धावा पूर्ण करण्यासाठी 82 धावांची गरज.
– विराटने जर या सामन्यात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो विश्वचषकाच्या इतिहासात सलग सहा डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा पहिला क्रिकेटपटू ठरेल.
– रोहितने आज जर चार किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत एमएस धोनीला मागे टाकत अव्वल क्रमांकावर येईल. सध्या रोहितने वनडेमध्ये 225 षटकार असून धोनीचे 228 षटकार आहेत.
– जर आज जसप्रीत बुमराहने 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो भारताकडून सर्वात जलद 100 वनडे विकेट्स घेण्याच्या मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी करेल. शमीने 56 सामन्यात 100 वनडे विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहच्या सध्या 55 सामन्यात 95 विकेट्स आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक इतिहासात असे पहिल्यांदाच घडले
–विजय शंकरच्या जागी निवड झालेल्या मयंक अगरवालची अशी आहे कामगिरी






