---Advertisement---

टॉप ५: हिटमॅन रोहित शर्माने शतकी खेळीबरोबरच केले हे खास ५ विक्रम

On: बुधवार, जून 5, 2019 11:00 PM
---Advertisement---

साउथँम्पटन। 2019 क्रिकेट विश्वचषकात आज आठवा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रोज बॉल स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत विश्वचषकाची विजयी सुरुवात केली आहे.

या सामन्यात भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने नाबाद शतकी खेळी करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 144 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 2 षटकार मारले. रोहितचे हे वनडे क्रिकेटमधील 23 वे शतक आहे.

त्याचबरोबर रोहितने तिसऱ्या विकेटसाठी केएल राहुल(26) बरोबर 85 धावांची तर एमएस धोनीबरोबर(34) चौथ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी रचत भारताला विजयाच्या समीप पोहचवले होते. अखेर रोहितला हार्दिक पंड्याने(15*) साथ देत भारताचा विजय निश्चित केला.

तसेच या सामन्यात रोहितने ही नाबाद शतकी खेळी करताना काही खास विक्रम केले आहेत. ते असे – 

1 –  रोहितने 23 वे वनडे शतक करत वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत सौरव गांगुलीला मागे टाकले आहे आणि या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.

वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय क्रिकेटपटू – 

49 – सचिन तेंडुलकर

41 – विराट कोहली

23 – रोहित शर्मा

22 – सौरव गांगुली

2 – विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक करणारे भारतीय क्रिकेटपटू –

सचिन तेंडुलकर – 2011

शिखर धवन – 2015

रोहित शर्मा – 2019

3 – रोहित शर्माने केली 2019 विश्वचषकातील भारताकडून पहिले शतक

4 – रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 8000 धावा पूर्ण. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पा पार करणारा रोहित भारताचा 7 वा सलामीवीर.

भारताकडून सलामीला सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू – 

15758 धावा – विरेंद्र सेहवाग

15335 धावा – सचिन तेंडुलकर

12258 धावा – सुनील गावस्कर

9157 धावा – सौरव गांगुली

8988 धावा – शिखर धवन

8418 धावा – गौतम गंभीर

8096 धावा – रोहित शर्मा

5 – रोहितचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12000 धावांचा टप्पा पार. हा टप्पा पार करणारा तो भारताचा 9 वा भारतीय क्रिकेटपटू.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषकाच्या पदार्पणातच युजवेंद्र चहलचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

विश्वचषक २०१९: एमएस धोनीने यष्टीरक्षकांच्या या खास यादीत ब्रेंडन मॅक्यूलमला टाकले मागे

विश्वचषक २०१९: रोहित शर्मा, विराट कोहलीने घेतले शानदार झेल, पहा व्हिडिओ

विश्वचषक २०१९: इंग्लंड आणि पाकिस्तानच्या या खेळाडूंना झाला दंड, जाणून घ्या कारण

विश्वचषकातून बाहेर पडलेल्या डेल स्टेनला विराट कोहलीने दिला भावनिक संदेश, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment