भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश आहे. भारतीय क्रिकेट संघाने अनेक शिखरे गाठली आहे. आजच (7 जानेवारी) त्यांनी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
त्याचप्रमाणे भारतात आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमही बाकी देशांच्या तुलनेत अधिक आहेत. भारतात एकूण 52 आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहेत. भारतानंतर इंग्लंडमध्ये सर्वाधिक 23 क्रिकेट स्टेडियम आहेत.
यातच भारतात आता जगातील सर्वात मोठे स्टेडियम तयार होत आहे. सध्या जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम असणाऱ्या मेलबर्न स्टेडियमपेक्षाही मोठे असणारे हे स्टेडियम गुजरातमधील अहमदाबाद येथे तयार होत असून गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) त्याच्यावर 2017पासून काम करत आहे. ही माहिती जीसीएचे उपाध्यक्ष परिमल नाथवाणी यांनी दिली.
अहमदाबादमध्ये याआधी असलेल्या मोटेरा स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेलांचे नाव दिले असून त्याची 54000 आसनक्षमता आहे. तर नवीन तयार होणारे स्टेडियम हे 63 एकर जागेवर बनत असून त्याची आसनक्षमता सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमपेक्षा दुप्पट आहे.
तसेच या नवीन स्टेडीयममध्ये 3 प्रॅक्टीस ग्राउंड, 1 इनडोअर क्रिकेट अॅकेडमी, क्लबहाउस आणि स्विमिंग पूल याचाही समावेश असणार आहे. हे स्टेडियम यावर्षात पूर्ण होईल. यावर अंदाजे 700 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.
World's Largest Cricket Stadium, larger than #Melbourne, is under construction at #Motera in #Ahmedabad,#Gujarat. Once completed the dream project of #GujaratCricketAssociation will become pride of entire India. Sharing glimpses of construction work under way. @BCCI @ICC #cricket pic.twitter.com/WbeoCXNqRJ
— Parimal Nathwani (@mpparimal) January 6, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–त्या देशात टीम इंडिया कधीही जिंकली नाही कसोटी मालिका
–या कारणामुळे चेतेश्वर पुजाराच आहे द्रविडचा वारसदार
–फक्त या देशांनी जिंकल्या आहेत या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका