वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामातील चौथा सामना ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळला गेला. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील या सामन्यात मुंबईने एकतर्फी वर्चस्व गाजवले. हायली मॅथ्यूजच्या शानदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने हा सामना 9 विकेट राखून आपल्या नावे केला. यासह मुंबईने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले.
स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुंबई या सामन्यातही त्याच निर्धाराने उतरली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजीची संधी मुंबईच्या गोलंदाजांना मिळाली. सोफी डिवाईन व स्मृती मंधाना यांनी संघाला 39 धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर अवघ्या पाच धावात आरसीबीने चार बळी गमावले. सायकीया इसाक व हायली मॅथ्यूज यांनी संघाची वाताहात केली. रिचा घोषने 28 तर कनिका आहुजाने 23 धावांचे योगदान दिले. मेगन शूटनेही 20 धावा करत आरसीबीला 150 पार मजल मारून दिली. मॅथ्यूजने सर्वाधिक चार बळी आपल्या नावे केले.
विजयासाठी मिळालेल्या 156 धावांचा पाठलाग करताना मॅथ्यूज व यास्तिका भाटियाने 45 धावांची सलामी दिली. भाटिया बाद झाल्यानंतर मॅथ्यूज व नॅट सिव्हर-ब्रंट यांनी आरसीबीला यश मिळू दिले नाही. दोघींनी अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. मॅथ्यूजने 38 चेंडूवर 77 व सिव्हरने 29 चेंडूवर 55 धावा केल्या. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली.
(WPL 2023 Mumbai Indians Beat RCB By 9 Wickets Hayley Matthews And Nat Sciver Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये नवी सुरुवात! युवा खेळाडूकडे नेतृत्व, तर दिग्गजाकडे प्रशिक्षकपद
बांगलादेशने केला अपसेट! विश्वविजेत्या इंग्लंडवर दणदणीत मात, शाकिबची अष्टपैलू कामगिरी