वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामातील चौथा सामना ब्रेबॉर्न स्टेडियम येथे सुरू झाला. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील या सामन्यात बेंगलोरची कर्णधार स्मृती मंधाना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीने या सामन्यात महाराष्ट्राच्या श्रेयंका पवार हिला संधी दिली.
https://twitter.com/wplt20/status/1632736508296691713?t=fw2MY1rvFbJ9OT4BMJPN_g&s=19
मुंबईने आपल्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सवर 143 धावांनी मोठा विजय मिळवला होता. मुंबईने उद्घाटनाच्या सामन्यात हरमनप्रीत कौर, एमेलिया कर व हायली मॅथ्यूज यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर 209 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर साकिया इसाक व नॅट सिव्हर यांच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने गुजरातचा डाव 64 धावांपर्यंतच रोखला होता.
दुसरीकडे आरसीबीला आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला. दिल्ली कॅपिटल्सने त्यांना 60 धावांनी पराभूत केले होते. दिल्लीने आरसीबीच्या गोलंदाजीचा समाचार घेताना 223 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर आरसीबीसाठी हिदर नाईट व मेगन शूट वगळता इतर फलंदाज फारसे योगदान देऊ शकले नव्हते.
मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन-
यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हेली मॅथ्यूज, नॅट सिव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), एमेलिया कर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक.
आरसीबी प्लेईंग इलेव्हन-
स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, दिशा कासट, रिचा घोष (यष्टीरक्षक), हिदर नाइट, कनिका आहुजा, मेगन शुट, श्रेयंका पाटील, प्रीती बोस, रेणुका ठाकूर सिंग.
(WPL 2023 RCB Won Toss And Elected Bat First Against Mumbai Indians
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे मालिकेतून बाहेर पडला ‘हा’ ऑस्टेलियन गोलंदाज, बुमराहनंतर मुंबई इंडियन्ससाठी दुसरा मोठा धक्का
VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर सूर्याने खेळला ‘सुपला शॉट’! व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल, तुम्ही पाहिला का?






