वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये शनिवारी (19 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्झ हा सामना खेळला गेला. स्पर्धेत एकही पराभव न पत्करलेल्या मुंबई इंडियन्सने अजिंक्य राहण्याच्या इराद्याने मैदानात पाऊल ठेवले. मात्र, एलिमिनेटरमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या युपी वॉरियर्झने त्यांचे मनसुबे उधळून लावले. अखेरचा षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात युपीने 5 विकेट्सने सामना आपल्या नावे केला.
https://twitter.com/UPWarriorz/status/1637081960576155651?t=zSt1HYzYYTovaQIE5qOPlg&s=19
डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात युपीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. युपीसाठी अंजली सरवानी व राजेश्वरी गायकवाड यांनी गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांना फटकेबाजी करू दिली नाही. सोफी एक्लस्टनने लागोपाठच्या षटकात यास्तिका भाटिया व नॅट सिव्हर-ब्रंटला बाद केले. एका बाजूने हायली मॅथ्यूजने 35 धावा केल्या. मॅथ्यूज व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी धावा जमवल्या मात्र त्यांना धावांची अपेक्षित गती राखता आली नाही. हरमन 25 धावांचेच योगदान देऊ शकली. त्यानंतर मुंबईची थोडीफार घसरगुंडी झाली. अखेर वॉंगने 32 धावा करत मुंबईला 127 पर्यंत मजल मारून दिली. युपीसाठी एक्लस्टनने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना युपीला 6.1 षटकात 27 धावांवर तीन बळी गमवावे लागले. यूपीचा संघ अडचणीत असताना ग्रेस हॅरिस व ताहलिया मॅकग्रा यांनी 44 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मॅकग्राने 38 धावांचे योगदान दिले. त्यानंतर हॅरिसही 39 धावा करून माघारी परतली. दोघींना एमेलिया करने बाद केले. अखेरीस दीप्ती शर्मा व सोफी एक्लस्टन यांनी संघाला विजयाच्या दिशेने नेले. अखेरच्या षटकात षटकार मारून सोफीने संघाला विजय मिळवून दिला.
(WPL 2023 UP Warriorz Beat Mumbai Indians By 5 Wickets Sophie Ecclestone Deepti Sharma Shines MI First Loss In Tournament)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका पराभवाने खचला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर; म्हणाला, ‘आम्ही राहुलसारखी फलंदाजी…’
ब्रेकिंग! विराटच्या RCBची ताकद वाढली, भारताविरुद्ध 140 धावा चोपणारा ‘हा’ खेळाडू ताफ्यात सामील






