सध्या महिला प्रीमियर लीगच्या दुसरा हंगाम सुरू असून त्याचा पाचवा सामना मंगळवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला आहे. तर या सामन्यात आरसीबी आणि गुजरात जायंट्सचे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात फील्ड अंपायर पराशर जोशी पहायला मिळाल्या नंतर त्यांना लोकांनी भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच म्हणू लागले आहेत. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफन व्हायरल होत आहे.
याबरोबरच, सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते अंपायरला श्रेयस अय्यरचा मोठा भाऊ म्हणत, तर कोणी गंमतीत म्हणाला की, अय्यरने अंपायरिंग सुरू केली आहे. याबरोबरच कोणीतरी श्रेयस अय्यर रणजी खेळण्यासाठी परत येत असल्याचा उल्लेख केला तेव्हा अनेकांनी त्याला शॉर्ट बॉलमुळे त्याच्या कमकुवतपणाबद्दल देखील चांगलेच ट्रोल केले आहे.
तसेच श्रेयस अय्यरने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने खेळले होते. त्यानंतर फिटनेसच्या समस्येमुळे त्याला संघात स्थान मिळाले नाव्हते. त्यानंतर एनसीएने अय्यरला फिट घोषित केले आणि त्यावरून दोन गोष्टी समोर आल्या होत्या. तर आता अय्यर आयपीएलपूर्वी रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी सज्ज झाला असून तो मुंबईकडून उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. तसेच मुंबईने आपला संघ जाहीर केला असून त्यात अय्यरच्या नावाचा समावेश करण्यात आले आहे.
Umpire Parashar Joshi resembles Shreyas Iyer. pic.twitter.com/vTSl4eJjfH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 27, 2024
दरम्यान, महिला प्रीमियर लीगच्या पाचव्या सामन्यात अचानक श्रेयस अय्यरच्या नावावर चर्चा सुरू झाल्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर प्रथम खेळताना गुजरात संघाला 20 षटकांत केवळ 107 धावा करता आल्या. हा सामना आरसीबीसाठी सोपा विजय ठरणार होता. स्मृती मानधना हिने संघाची दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे लीगच्या पाचव्या सामन्यात आरसीबीने गुजरात जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला आणि 45 चेंडू बाकी असताना 108 धावांचे लक्ष्य गाठले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : अर्रर्र..! हार्दिक पांड्याने मारला टोमणा, म्हणाला, ‘ तुझ्यात ताकद असेल तर…
- WPL 2024 : स्मृती मंधानाने फोड फोड फोडलं, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गुजरातवर दमदार विजय