महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये आज गतविजेता मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात लढत झाली. या लढतीत नाणेफेकीचा कौल जिंकून युपी वॉरियर्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 6 गडी गमवून 161 धावा केल्या आणि विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं. तसं पाहिलं तर हे आव्हान मोठं होतं. पण सोलापूरच्या किरण नवगिरेच्या वादळापुढे मुंबईचं काहीच चाललं नाही. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडत तिने 31 चेंडूत 57 धावांची वादळी खेळी केली आहे. यामुळे यूपी वॉरियर्सने गतविजेत्यांना पराभवाची धुळ चारली आहे.
याबरोबरच, नाणेफेक हारल्यानंतर मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली होती. तर सलामीला आलेल्या स्फोटक फलंदाज हेली मॅथ्यूजने धडाकेबाज फलंदाजी करताना 55 धावांची उत्कृष्ट खेळी करत हेली मॅथ्यूजने या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार लावला आहे. दुसरी सलामीवीर यस्तिका भाटियानेही 26 धावा केल्या. तर दोघीनी मिळून 8 षटकांत 50 धावांची सलामी देखील दिली होती. असे असतानाही मुंबई इंडियन्स संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 161 धावांपर्यंत मजल मारू शकला होता.
Back to back SIXES from Navgire as she brings up her FIFTY off just 25 deliveries.
A solid knock this! 🔥💥👏
Live – https://t.co/B5aPe30OXX #TATAWPL #MIvUPW pic.twitter.com/ZxgVK6IR5h
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 28, 2024
तसेच युपी वॉरियर्सकडून ग्रेस हॅरिस, अंजली सर्वानी, सोफी एक्सलस्टोन, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला आहे. तर मुंबईचे 162 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या यूपीने धडाकेबाज सुरूवात केली. सलामीवीर एलिसा हेली आणि आज संधी मिळालेल्या किरण नवगिरेने धडाकेबाज फलंदाजी केली. या दोघांनी 9.1 षटकात 94 धावांची सलामी दिली. यात किरणच्या 31 चेंडूत केलेल्या 57 धावांचा मोठा वाटा होता. तिने आपल्या खेळीत 4 षटकार अन् 6 चौकार मारले. तर हेलीने 31 धावांचे योगदान दिले आहे.
Innings Break!@mipaltan post a total of 161/6 on the board.@UPWarriorz chase coming up shortly. Stay tuned!
Scorecard – https://t.co/B5aPe30OXX #TATAWPL #MIvUPW pic.twitter.com/c99l0iXhil
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 28, 2024
दरम्यान, या सामन्यात मुंबई इंडियन्सची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हा सामना खेळत नाव्हती. तर तिच्या जागी नॅट सेव्हियर ब्रंट कर्णधारपदाची धुरा सांभाळत होती. तसेच हेली मॅथ्यूज वगळता मुंबई इंडियन्सचा एकही फलंदाज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. त्यानंतर त्यांना या हंगामात पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, पूनम खेमनार, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड.
महत्वाच्या बातम्या –
- भारतीय क्रीडा विज्ञान परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री श्री अनुराग सिंह ठाकूर यांनी देशातील राष्ट्रीय केंद्रांमध्ये क्रीडा विज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला
- मोठी बातमी! बीसीसीआयची वार्षिक करार यादी जाहीर, ए-प्लस श्रेणीत रोहितसह ‘हे 4 खेळाडू, अय्यर-किशनला थेट डच्चू