महिला प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या नववा सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना मुंबईने 7 गडी राखून जिंकला. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच बंगळुरुला 20 षटकात 131 धावांवर रोखलं. बंगळुरुने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 132 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 15.1 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं आहे.
याबरोबरच या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. हा निर्णय मुंबईच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी योग्य ठरवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. मागच्या पर्वातही मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दोनदा पराभूत केलं होतं.
या सामन्यात मुंबईचा संघ आपली नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरशिवाय खेळत होता. पण नॅट सीव्हर ब्रंटच्या नेतृत्वाखाली संघाने अप्रतिम कामगिरी करत मोसमातील तिसरा विजय नोंदवला. या विजयासह गतविजेत्या मुंबई संघाने आता तीन संघांचा पराभव करत अव्वल स्थान गाठले आहे. या सामन्यापूर्वी मुंबई गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होती. मात्र आता मुंबई संघाने अव्वल स्थान पटकावले आहे.
तसेच महिला प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्सने पहिल्या दोन सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्सचा पराभव झाला होता. त्यानंतर अखेरच्या सामन्यात हरमनप्रीत कौरविना असलेल्या मुंबई संघाला यूपी वॉरियर्सकडून पराभव पत्करावा लागला. आता संघाने पुनरागमन केले आणि आरसीबीला हरवून तिसरा विजय नोंदवला आहे.
दरम्यान, सर्वाधिक तीन विजयानंतर मुंबईचे गुणतालिकेत सहा गुण झाले आहेत. तर दुसरीकडे, या पराभवानंतर आरसीबी चौथ्या स्थानावर घसरला आणि त्याचा निव्वळ रनरेटही मायनसमध्ये गेला आहे. तसेच पहिले दोन सामने जिंकल्यानंतर स्मृती मानधनाच्या संघाने दिल्ली आणि मुंबईविरुद्धचे सामने गमावले आहेत.
The Mumbai Indians are back to winning ways! 💙
And with that victory, they move to the 🔝 of the table 👏👏
Scorecard 💻📱https://t.co/VqyJ4Y545d#TATAWPL | #RCBvMI | @mipaltan pic.twitter.com/SuUWM8b89P
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 2, 2024
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, एस सजना, अमनजोत कौर, हुमैरा काझी, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने कसली कंबर, ‘हे’ खेळाडू शिबिरात झाले सामिल, अन् धोनी…
- ग्लेन फिलिप्सचा पंजा..! पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडसमोर 369 धावांचे लक्ष