वुमन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा थरार शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. मात्र मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सप्रमाणेच सामन्यात रंगत आली होती. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता होती. पण दीप्ती शर्मा काही चमत्कार करता आला नाही. शेवटच्या चेंडूवर 3 धावा घेता आल्या. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने युपी वॉरियर्सवर 2 धावांनी विजय मिळवला आहे.
याबरोबरच, शोभना ही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघासाठी आशेचा किरण ठरली असून तीने या सामन्यात तिने पाच विकेट घेतल्या आहेत. यासह ती डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात पाच बळी घेणारी पहिली भारतीय गोलंदाज देखील ठरली आहे. तसेच 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा करू शकला आहे.
घ्या जाणून कोण आहे शोभना आशा?
आशा शोभनाचा जन्म केरळमधील त्रिवेंद्रम येथे झाला असून तिचे वडील ऑटो ड्रायव्हर होते, पण त्यांनी आपल्या मुलीच्या क्रिकेटर होण्याच्या मार्गात आर्थिक अडचण येऊ दिली नाही. शोभना इंडिया ए वुमन, इंडियन बोर्ड प्रेसिडेंट्स वुमन इलेव्हन, केरळ आणि पुद्दुचेरी तसेच रेल्वेकडून खेळली आहे. शोभना आशाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने WPL च्या पहिल्या हंगामात 10 लाख रुपयांना संघात घेतले होते. शोभनाच्या रूपाने आरसीबीला एक उत्तम गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
तसेच गेल्या वर्षी आरसीबीकडून खेळताना त्याने 5 सामन्यात 5 बळी घेतले होते. तिला बहुतांश सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण आता शोभनाने पहिल्याच सामन्यात 5 बळी घेत इतिहास रचला आहे. याबरोबरच शोभनाने एका षटकात 3 विकेट घेत सामचा फिरवला. 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर श्वेता शेरावत, चौथ्या चेंडूवर ग्रेस हॅरिस आणि सहाव्या चेंडूवर किरण नवगिरेला बाद करून तिने सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर खिशात टाकला आहे.
दरम्यान, या 5 विकेट्ससह शोभना आशा WPL मध्ये 5 बळी घेणारी जगातील चौथी गोलंदाज ठरली आहे. सर्वात आधी अमेरिकेच्या तारा नॉरिसने गेल्या वर्षी 5 विकेट घेत इतिहास रचला होता. डब्ल्यूपीएलमध्ये 5 विकेट घेणारी ती पहिली गोलंदाज होती. यासोबतच गेल्या वर्षी गुजरातच्या मॅरिझान कॅपने 15 धावांत 5 बळी घेतले होते. तर किम गर्थने 36 धावांत 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. आता या यादीत शोभना आशा यांचे नाव जोडले गेले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेईंग ईलेव्हन | स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, सबिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, शोभना आशा, रेणुका ठाकूर सिंग.
यूपी वॉरियर्स वूमन्स प्लेईंग ईलेव्हन | अलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, किरण नवगिरे, वृंदा दिनेश, पूनम खेमनार, श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, सायमा ठाकूर.
महत्वाच्या बातम्या –






