WPL 2026च्या दुसऱ्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी पराभव केला. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार खेळी केली. तिने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 195 धावा केल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ 145 धावांवर आटोपला.
अमेलिया केर शून्यावर बाद झाल्यावर मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. जी कमलिनी देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली ती 16 धावा करून माघारी परतली. त्यानंतर नॅट सेव्हियर ब्रंट आणि हरमनप्रीत कौरने दमदार अर्धशतके झळकावली आणि संघाला मोठी धावसंख्या गाठण्यास मदत केली. ब्रंटने 46 चेंडूत 13 चौकारांसह 70 धावा केल्या. हरमनप्रीतने 42 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 74 धावा केल्या. मुंबईने 20 षटकात एकूण 195 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाज हरमनप्रीत आणि सेव्हिअर ब्रंटविरुद्ध अपयशी ठरले. नंदिनी शर्माने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
दिल्लीकडून चिनेल हेन्रीने सर्वाधिक 56 धावा केल्या, परंतु ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. तिच्याशिवाय इतर कोणलाही सातत्यपूर्ण फलंदाजी करता आली नाही. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज फक्त एका धावेवर बाद झाली. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे दिल्लीला पूर्ण 20 षटकेही पूर्ण खेळता आली नाहीत.
मुंबई इंडियन्सकडून निकोला केरी आणि अमेलिया केर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. याव्यतिरिक्त, नॅट सेव्हिअर ब्रंटने दोन विकेट घेतल्या. शबनम इस्माइलने एक विकेट घेतली.






