---Advertisement---

WPL 2026 वेळापत्रक जाहीर: दोन मैदानांवर 28 दिवसांत फायनलसह खेळवले जाणार 22 सामने

On: शनिवार, नोव्हेंबर 29, 2025 12:20 PM
---Advertisement---

महिला प्रीमियर लीग (WPL) च्या चौथ्या सीजनासाठी 27 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत मेगा ऑक्शनचं आयोजन करण्यात आलं. यावेळी सर्व पाच संघांनी आपल्या स्क्वॉडमध्ये मोठे बदल केले असून आगामी हंगामाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ऑक्शनसोबतच बीसीसीआयने WPL 2026 चा संपूर्ण वेळापत्रकही जाहीर केला आहे.

2026 चा टी20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून भारतात सुरू होत असल्याने WPL चा चौथा हंगाम यंदा लवकर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे WPL 2026 ची अधिकृत सुरुवात 9 जानेवारीपासून होणार असून ग्रँड फिनाले 5 फेब्रुवारीला खेळवले जाणार आहे. म्हणजेच संपूर्ण स्पर्धा 28 दिवस चालणार आहे.

WPL 2026 मध्ये एकूण 22 सामने होतील. यापैकी पहिल्या 11 सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर तर उर्वरित 11 सामने, त्यात एलिमिनेटर आणि फायनलसह, वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर आयोजित केले जातील. 10 आणि 17 जानेवारी या दोन दिवशी डबल हेडर असतील, तर इतर सर्व दिवशी एकच सामना खेळवला जाईल.

स्पर्धेचा पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात रंगणार आहे. लीग स्टेजची सामन्यांची मालिका 1 फेब्रुवारीला संपेल. त्यानंतर 3 फेब्रुवारीला एलिमिनेटर सामना होईल आणि 5 फेब्रुवारीला वडोदऱ्यामध्ये हंगामाचा शेवटचा सामना पार पडेल.

नवी मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये खेळवली जाणारी ही लीग भारतीय महिला क्रिकेटला नवी दिशा देणारी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खेळाडूंच्या नव्या संघरचनेसह आणि व्यस्त शेड्यूलमुळे WPL 2026 हंगाम रोमांचक ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---