भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय पहिल्यांदाच इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर वुमेन्स प्रीमियर लीग (WPL 2023) स्पर्धेचे आयोजन करत आहे. या लीगबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. स्पर्धेचा लिलाव (WPL Auction) व सामन्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता खेळाडूंची आधारभूत किंमत व खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 24 खेळाडूंना सर्वाधिक रकमेच्या गटाच्या ठेवण्यात आले आहे.
🚨 NEWS 🚨: Women’s Premier League 2023 Player Auction list announced. #WPLAuction
All The Details 🔽 https://t.co/dHfgKymMPN
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 7, 2023
वुमेन्स प्रीमिअर लीगसाठी जवळपास 1200 खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. त्यानंतर खेळाडूंची अंतिम यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार एकूण 409 खेळाडूंची निवड केली गेली आहे. त्यामुळे यातून आता केवळ 90 खेळाडूंवर बोली लागेल. 13 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे होणाऱ्या लिलावात प्रत्येक फ्रँचायझी खेळाडूंवर 12 कोटी रुपये खर्च करू शकेल. संघांना कमीतकमी 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडूंवर बोली लावता येईल.
या लिलावात खेळाडूंना पाच आधारभूत किमतींच्या गटात विभागले गेले आहे. त्यानुसार 50 लाख, 40 लाख, 30 लाख, 20 लाख व 10 लाख अशी आधारभूत किंमत खेळाडूंची असेल. 24 प्रमुख खेळाडूंची बोली 50 लाखांपासून सुरू होईल. या 24 पैकी 10 खेळाडू भारतीय आहेत.
या स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी होतील. ही संपूर्ण स्पर्धा मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियम व डॉ. डी.वाय पाटील स्टेडियम येथे 4 ते 26 मार्च दरम्यान खेळली जाईल.
50 लाख आधारभूत किंमत असलेल्या खेळाडू:
हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शफाली वर्मा, दिप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंग, मेघना सिंग, स्नेह राणा, पुजा वस्त्राकार, रिचा घोष (सर्व भारत), मेग लॅनिंग, ऍश्ले गार्डनर, एलिस पेरी, एलिसा हिली, जेस जॉन्सन, डार्सी ब्राऊन (सर्व ऑस्ट्रेलिया), सोफी एक्लस्टन, नतालिया सिवर, कॅथरीन ब्रंट, डॅनी वॅट (सर्व इंग्लंड), सोफी डिवाईन (न्यूझीलंड), लिरीन फिरी (झिम्बाब्वे), डिएंड्रा डॉटीन (वेस्ट इंडिज), सिनालो जाफ्ता (दक्षिण आफ्रिका).
(WPL Auction 2023 Smriti Harmanpreet And 22 More In Highest Base Price Category)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कशी नशिबानं थट्टा आज मांडली! अनबॉक्सिंग करण्यापूर्वीच गमावला विराटचा नवा कोरा फोन, चाहत्यांकडे मागितली मदत
राहुलने पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनची माहिती केली लीक! ताबडतोब घ्या जाणून