सध्या भारतीय क्रिकेटमध्ये महिला आयपीएल स्पर्धेची चांगलीच चर्चा सुरू आहे. अशातच यामधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्या खांद्यावर नवीन जबाबदारी आली आहे. अदानी समूहाची क्रीडा विकास शाखा अदानी स्पोर्ट्सलाईनने महिला प्रीमिअर लीग (डब्ल्यूपीएल) स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिला गुजरात जायंट्स संघाची मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून निवडले आहे.
महिला आयपीएल (Women IPL) स्पर्धेचे आयोजन मार्च महिन्यात होणार आहे. यापूर्वीच मिताली राज (Mithali Raj) ही गुजरात जायंट्स (Gujarat Giants) संघाची मार्गदर्शक बनली आहे. एक मार्गदर्शक आणि सल्लागाराच्या रूपात मिताली महिला क्रिकेटलाही प्रोत्साहन देईल. मिताली गुजरातमध्ये क्रिकेट खेळ विकसित करण्यासाठी मदतही करेल. शनिवारी (दि. 28 जानेवारी) भारताची माजी कर्णधार मिताली भाष्य केले.
ती म्हणाली की, “डब्ल्यूपीएल (WPL) स्पर्धेचा पहिला हंगाम हा महिला क्रिकेटसाठी चांगला निर्णय आहे. तसेच, अदानी समूहाची भागीदारी खेळासाठी प्रोत्साहन आहे. महिला क्रिकेट वेगाने वाढत आहे. तसेच, अशाप्रकारची प्रेरणा युवा महिला खेळाडूंना व्यावसायिकरीत्या क्रिकेटचा विचार करण्यासाठीही प्रोत्साहित करेल. माझा असा विश्वास आहे की, कार्पोरेट्सचा उच्च प्रभाव असणारी भागीदारी शेवटपर्यंत भारताला आणखी गौरव मिळवून देण्याची प्रक्रिया वेगवान करण्यास मदत करेल. याचा प्रभाव खेळाला मजबूत करण्यात आणि महिला खेळाडूंसाठी संधी वाढवण्यात मदत करू शकतो.”
महिला आयपीएलमध्ये असणार पाच संघ
बीसीसीआयने सुरू केलेल्या महिला प्रीमिअर लीग (Womens Premier League) स्पर्धेत एकूण 5 संघ असतील. त्यात गुजरात जायंट्स संघाव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि कॅप्री ग्लोबल यांनी लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत. पहिल्या 3 वर्षात 22 सामने होतील. पहिला हंगाम मुंबई आणि आसपासच्या ठिकाणांवर आयोजित केला जाईल. (wpl former indian cricketer mithali raj appointed gujarat giants mentor)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs NZ 2nd T20: भारत-न्यूझीलंडमध्ये कोण कुणावर भारी? वाचा आमने-सामने रेकॉर्ड काय सांगतो
ICC U19 Womens T20 Final: कुठे, कधी आणि कशी पाहता येईल भारत-इंग्लंड संघातील फायनल? जाणून घ्याच