टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमधील गुरुवारचा दिवस (५ ऑगस्ट) भारतासाठी ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात यशस्वी दिवस ठरला. पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक आपल्या नावे केल्यानंतर, कुस्तीपटू रवी कुमार दहियाने रौप्यपदक जिंकले. दिवसातील तिसरे आणि अखेरचे पदक मिळवण्यापासून युवा कुस्तीपटू दिपक पुनिया वंचित राहिला. कांस्य पदकासाठी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात त्याला ३-२ ने पराभूत व्हावे लागले.
असा झाला सामना
पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारातील उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतरही रेपचेज राउंड नियमानुसार दिपकला कांस्य पदकासाठीचा सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याच्यासमोर सॅन मारिनोच्या अमिन माईल्सचे आव्हान होते. दिपकने दोन गुण घेत दमदार सुरुवात केली. त्यानंतर, माईल्सला एक तांत्रिक गुण मिळाला. पहिल्या राउऊंडनंतर दिपककडे एका गुणाची मामुली आघाडी होती. दुसऱ्या राउंडच्या अखेरीस माईल्सने दोन गुणांचा डाव टाकत ४-२ असा सामना आपल्या नावे केला.
पहिलीच ऑलिम्पिक खेळत होता दिपक
केवळ २२ वर्षाचा असलेला दिपक प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. ऑलम्पिकसाठी त्याला दुसरे मानांकन देण्यात आले होते. दिपकला उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिसकडून पराभूत व्हावे लागले होते. हे पदक मिळवले असते तर तो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा सातवा भारतीय कुस्तीपटू ठरला असता.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटने वाईट दिवसांची काढली आठवण; म्हणाला, ‘कठीण काळात सचिनला मदत मागितली आणि…’
टोकियो ऑलिंपिकमधील रवी दहियाच्या सोनेरी कामगिरीचा ग्रामस्थांकडून जल्लोष, गावभर केला दीपोत्सव
इतिहासात नोंद झालेली विकेट आणि वेंकटेश प्रसाद