टोकियो ऑलिम्पिकच्या चौदाव्या दिवशी (गुरुवार, ५ ऑगस्ट) भारतातर्फे सर्वात मोठे आव्हान कुस्तीपटू रवी कुमार दहियाने सादर केले. सुवर्ण पदकासाठी झालेल्या सामन्यात रवी कुमारला रशियाच्या झावूर युगवेवने ७-४ अशा फरकाने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. रवी भारतासाठी ऑलिम्पिक रौप्य पदक जिंकणारा दुसरा कुस्तीपटू ठरला.
असा झाला सामना
पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारातील सुवर्णपदकासाठी झालेल्या या सामन्यात रशियाचा कुस्तीपटू झावूर युगवेवने रवी कुमारला आव्हान दिले. पहिल्या राऊंडच्या प्रारंभी युगवेवने दोन गुण घेत सुरुवात केली. त्यानंतर रवीने एकाच डावात दोन गुण घेत बरोबरी केली. युगवेवने पुन्हा दोन गुणांच्या डाव टाकत पहिला राऊंडमध्ये ४-२ अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या राउंडमध्ये युगवेवने एक गुण मिळवत सुरुवात केली. युगवेवने पुन्हा टेकडाऊन करत दोन गुणांची वाढ केली. रवीने दोन गुण मिळवत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो युगवेवची आघाडी मोडून काढू शकला नाही आणि युगवेवने सुवर्ण पदकावर कब्जा केला.
Another medal for @WeAreTeamIndia!
Kumar Ravi of #IND takes #silver in the men's freestyle 57kg #Wrestling#StrongerTogether | @Tokyo2020 | @Wrestling pic.twitter.com/7bNZ4jdfya
— The Olympic Games (@Olympics) August 5, 2021
अशी राहिली होती स्पर्धेतील घोडदौड
पुरुषांच्या ५७ किलोग्राम वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात रवी कुमारने बुधवारी उपान्त्य फेरीसह तीन सामने खेळत अंतिम फेरीत जागा पटकावली होती. पहिल्या फेरीत नायजेरियाच्या कुस्तीपटूला पराभूत केल्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात रवी कुमाने बल्गेरियाच्या व्हॅलेंटिनोव्ह जॉर्जी वांगेलोव्हला तांत्रिक श्रेष्ठतेने १४-४ ने पराभूत करत उपांत्य सामन्याचे तिकीट खिशात घातले होते. उपांत्य फेरीत अखेरच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या सामन्यात कझाखस्तानच्या सनायव नूरोस्लामला चित्रपट करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
ऑलम्पिक पदक पटकावणारा सहावा भारतीय कुस्तीपटू
रवी कुमार ऑलिम्पिक पदक पटकावणारा सहावा भारतीय कुस्तीपटू ठरला. भारतासाठी कुस्तीतील पहिले ऑलिम्पिक पदक खाशाबा जाधव यांनी १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाच्या रूपाने पटकावले होते. त्यानंतर २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य व २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्याची कामगिरी सुशील कुमार याने केलेली. लंडन ऑलिम्पिकमध्येच योगेश्वर दत्त यानेदेखील कांस्य पदक मिळवले होते. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कांस्य पदक जिंकून इतिहास रचला होता.
महत्त्वाच्या बातम्या –