भारताचा ऑलम्पिक रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार दहियाने बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले. ५७ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये त्याने ही कामगिरी करून दाखवली.
GOLD 🥇 for Ravi Kumar Dahiya in Wrestling! India’s 10th GOLD at Commonwealth Games 2022 #CWG2022 #TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/nXdipu7SnL
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 6, 2022
रवीने शनिवारी (६ ऑगस्ट) ५७ किलो ग्रॅम वजनी गटाच्या अंतिम फेरीत तांत्रिक गुणांच्या आधारे हे सुवर्ण पदक जिंकले. रवीने हा सामना १०-० ने जिंकला. रवीने न्यूझीलंडच्या सूरज सिंगला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती.
रवीचा अंतिम फेरीचा सामना नायजेरियाच्या एबिकेनिमो वेल्सन याच्याशी झाला. वेल्सनने सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारले. मात्र, रवीने शक्ती आणि युक्तीच्या जोरावर वेल्सनला हात टेकण्यास भाग पाडले. त्याने अत्यंत शिताफीने एकेरी दुहेरी गुण घेत १०-० अशी आघाडी घेत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. हा सामना जिंकण्यासाठी अवघा २ मिनिटे व १६ सेकंद इतका वेळ लागला.
कुस्तीत भारताची यशस्वी घौडदौड
भारतीय पथकासाठी कुस्तीचे दोन्ही दिवस शानदार ठरले. ५ ऑगस्ट रोजी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी सहा पदके भारताने पटकावले होती. ऑलम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया व साक्षी मलिक सह दीपक पुनिया याने सुवर्णपदकावर आपला हक्क सांगितला होता. त्या व्यतिरिक्त अंशू मलिकने रौप्य तसेच दिव्या कांकरान आणि मोहित ग्रेवालने कांस्य पदक आपल्या नावे केलेले. तर दुसऱ्या दिवशी रवीसह विनेश फोगटनेही सुवर्णपदक जिंकले. युवा कुस्तीपटू पूजा गहलोतला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकाच्या तयारीवरून दिनेश कार्तिकचे बडे बोल! म्हणाला, ‘भारताला…’
इंग्लंडला बगल देत टीम इंडियाने गाठली फायनल! स्म्रीतीचे अर्धशतक तर गोलंदाजीत ‘या’ खेळाडूने दाखवले कसब