ऑलिम्पिक कांस्य विजेती भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने शुक्रवारी (५ ऑगस्ट) बर्मिंघम येथे खेळल्या जात असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ६२ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. साक्षीने अंतिम फेरीत कॅनडाच्या ऍना गोन्झालेझचा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील साक्षीचे हे पहिले सुवर्णपदक आहे. साक्षीने २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. तर २०१८ मध्ये साक्षीने गोल्ड कोस्टमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
What a comeback! @SakshiMalik achieves her best ever performance at the #commonwealthgames in style winning a 🥇 in the women’s freestyle 🤼♀️ 62 KG category @birminghamcg22 . This is team 🇮🇳 8th Gold Medal at the ongoing #commonwealthgames2022 . #ekindiateamindia #b2022 pic.twitter.com/E6uA7x8oRX
— Team India (@WeAreTeamIndia) August 5, 2022
दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्धी या अंतिम सामन्यात खेळत होते. साक्षीने आक्रमक सुरुवात केली मात्र तिला गुण घेण्यात यश आले नाही. पहिल्या फेरीमध्ये पूर्णपणे कॅनडाच्या ऍनाचे वर्चस्व राहिले. तिने ४-० अशी महत्त्वाची आघाडी मिळवली होती.
दुसऱ्या फेरीत येताच साक्षीने दमदार खेळ दाखवत टेकडाउनमधून दोन गुण घेतले आणि नंतर ऍनाला चितपट करून सुवर्ण जिंकले. पहिल्या फेरीत साक्षी ज्या पद्धतीने बॅकफूटवर होती, ते पाहता ती जिंकू शकेल असे वाटत नव्हते. मात्र, दुसऱ्या फेरीत येताच तिने आपली ताकद दाखवत ऍनाचा काही सेकंदांत पराभव केला. साक्षीने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये ज्या प्रकारे शेवटच्या क्षणी पाच गुण मिळवून भारताच्या झोळीत कांस्यपदक टाकले होते, तशाच प्रकारची तिची ही कामगिरी होती.
रिओ ऑलिंपिकमध्ये पदक जिंकल्यानंतर साक्षी खराब फॉर्ममध्ये होती. दोन वर्षापासून ती भारतीय संघाचा भाग नव्हती. या काळात आपण डिप्रेशन मध्ये गेलो होतो अशी कबुली तिने दिली होती. मात्र, आता सुवर्णपदक पटकावत तिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी सर्व पदके जिंकण्याची अनोखी कामगिरी करून दाखवली.
महत्त्वाच्या बातम्या-
BREAKING: बजरंगाची पुन्हा कमाल! मारली कॉमनवेल्थ मेडलची हॅट्रिक