---Advertisement---

वृद्धिमान साहाच्या मुलाचा बड्डे जल्लोषात साजरा, ‘विरुष्का’सह भारतीय खेळाडूंची उपस्थिती; फोटो व्हायरल 

On: मंगळवार, मार्च 9, 2021 12:06 PM
---Advertisement---

भारतीय संघाने नुकतीच इंग्लंड विरुद्ध झालेली कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे. यानंतर १२ मार्चपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना काही वेळ विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे खेळाडू मौजमजा करण्याची कुठलीही संधी गमावताना दिसत नाहीये. भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला भारतीय संघातील काही खेळाडूंनी आवर्जून हजेरी लावली आहे.

वृद्धिमान साहाने आपला मुलगा अन्वय याचा पहिला वाढदिवस ६ मार्च रोजी साजरा केला. यानिमित्ताने भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी उपस्थित राहून वाढवदिवसाची शोभा वाढवली. यामध्ये विराट कोहलीसह त्याची पत्नी अनुष्का शर्माने देखील हजेरी लावली होती. तसेच संघातील इतर खेळाडू देखील सहभागी होते. या याप्रसंगी भारतीय संघाच्या खेळाडूंनी डान्सही केला. यावेळी भारतीय खेळाडूंचे मस्ती करतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत वृद्धिमान साहाला संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला अंतिम ११ जणांमध्ये संघात खेळायची संधी मिळाली नाही. भारतीय संघात रिषभ पंत उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्यामुळे साहाला संघाबाहेर राहावे लागत आहे.

वृद्धिमान साहाची कामगिरी

भारतीय संघात २०१० साली पदार्पण करणाऱ्या वृद्धिमान साहाने आतापर्यंत एकूण ३८ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने २९.१ च्या सरासरीने १२५१ धावा केल्या आहेत. यात ३ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच एक दिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने एकूण ९ सामने खेळले आहेत. यात त्याला ४१ धावा करण्यात यश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मास्टर ब्लास्टरचं क्रिकेटप्रेम, दुखापत झाली तरीही सुई घेऊन मैदानात उतरणार; पाहा व्हिडिओ

पक्काचं समजा! टी२० मालिकेत भारताचा विजय जवळपास निश्चित, असं आम्ही नाही ही आकडेवारी सांगते

टी२० विश्वचषक: ‘गब्बर’चं स्थान धोक्यात, रोहितसोबत ‘हा’ फलंदाज उतरणार सलामीला?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---