आयपीएल २०२२ मध्ये भारताचा अनुभवी यष्टीरक्षक पलंदाज वृद्धिमान साहाने चांगले प्रदर्शन केले आहे. आयपीएलमध्ये यावर्षी नव्याने सहभागी झालेला संघ गुजरात टायटन्सने त्याला संधी दिली होती आणि तो या विश्वासास पात्र ठरला आहे. आयपीएल हंगाम संपल्यानंतर रणजी ट्रॉफीचा दुसरा टप्पा सुरू होईल. अशात साहा देशांतर्गत क्रिकेटमधील या मानाच्या स्पर्धेत पुनरागमन करणार असल्याची माहिती मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता, पण आता त्याने बांगलच्या रणजी संघात पुनरागमन केले आहे.
तीन महिन्यापूर्वी भारताच्या कसोटी संघात वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) हे नाव वगळले गेले. त्यानंरत रणजी ट्रॉफीच्या साखळी सामन्यांमधूनही त्याने माघार घेतली. पण आता झारखंडविरुद्धच्या क्वार्टर फायनल सामन्यात साहा बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा सामना ६ जून रोजी बंगळुरूमध्ये खेळला जाणार आहे. यादरम्यानच्या काळात गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ साठी त्याला खरेदी केले. आयपीएलमधील त्याचे प्रदर्शन कौतुकास्पद राहिले आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील या संघासाठी खेळताना साहाने ८ सामन्यांतील तीन अर्धशतकांच्या मदतीने २८१ धावा केल्या आहेत.
बंगाल क्रिकेट संघाने (CAB) भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला देखील संघात सामील केले आहे. पण तो प्रत्यक्षात सामना खेळेलच याची कसलीही खात्री देता येणार नाही. भारतीय संघाचे आगामी काळातील वेळापत्रक व्यस्त आहे आणि याच कारणास्तव त्याच्या कार्यभाराचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड स्वतः शमीच्या कार्यभारावर लक्ष ठेवून आहे. त्याव्यतिरिक्त बंगालच्या संघात मोहम्मत शमीचा लहान भाऊ मोहम्मद कैफ आणि फिरकी गोलंदाज अंकित शर्मा यांनाही संधी मिळाली आहे.
रणजी क्वार्टर फायनलसाठी असा आहे बंगाल संघ:
अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), मनोज तिवारी, वृद्धिमान साहा, मोहम्मद शमी, अनुस्तुप मजूमदार, सुदीप चॅटर्जी, शाहबाज अहमद, अभिषेक रमन, रितिक चॅटर्जी, सयान शेखर मंडल, मुकेश कुमार, आकाश दीप, ईशान पोरेल, कौशिक घोष, ऋत्विक रॉय चौधरी, प्रदीप्त प्रमाणिक, करण लाल, नीलकंठ दास, सुदीप घरामी, अभिषेक पोरेल, मोहम्मद कैफ, अंकित मिश्रा.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दिल्लीच्या पंजाबवरील विजयानंतर कोणाला आहे प्लेऑफसाठी सर्वाधिक चान्स? जाणून घ्या समीकरण
संघमालकाने वॉर्नला इमोशनल केलं आणि राजस्थान रॉयल्स बनला पहिला आयपीएल चॅम्पियन
एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज: सार्थ बनसोडेचा मानांकित खेळाडूवर विजय