---Advertisement---

‘कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मला भीती वाटली होती’, साहाने सांगितला स्वानुभव

On: गुरूवार, मे 13, 2021 11:37 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाली होती. नुकताच स्वतः साहाने कोरोनाविरूद्ध आपला लढा किती कठीण होता, याविषयी खुलेपणाने माहिती दिली आहे. ज्या दिवशी साहा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता, त्याच दिवशी बीसीसीआयने आयपीएल 2021 हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित केले होते.

खरंतर, साहाने थकवा आणि थंडीची तक्रार केली होती व त्यानंतर त्याची दोनदा चाचणी घेण्यात आली आणि दोन्ही वेळा तो निगेटिव्ह आढळला होता. पण ताप वाढल्यानंतर साहाची पुन्हा चाचणी झाली आणि यावेळी तो पॉझिटिव्ह आढळला.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत साहाने कोरोना संसर्ग झाल्यानंतरचा त्याचा अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला की, ‘माझे सराव सत्र संपल्यानंतर मला थकवा जाणवत होता. मला थंडी जाणवत होती आणि मला सौम्य कफ झाला होता. याबद्दल मी टीमच्या डॉक्टरांना माहिती दिली. त्याच दिवशी माझी कोरोना चाचणी झाली. दुसर्‍या दिवशी हा अहवाल निगेटिव्ह आला. दुसर्‍या दिवशीही चाचणी घेण्यात आली आणि त्याचाही अहवाल निगेटिव्ह आला. मला इतरांसोबत राहण्यास नकार देण्यात आला होता कारण तोपर्यंत मला तापही येऊ लागला होता. अखेर तिसर्‍या कोरोना चाचणीत मी पॉझिटिव्ह आढळलो.’

साहा म्हणाला की, ‘कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मला भीती वाटली होती. कुटुंबातील प्रत्येकजण खूप काळजीत होता. आम्ही त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे आश्वासन दिले की घाबण्याचे कारण नाही. माझी चांगली काळजी घेतली जात आहे. दरम्यान, साहा म्हणाला की आता शरीरात कोणत्याही प्रकारची समस्या नाही. ताप येत नाही. कालांतराने थंडीही कमी झाली. शरीरात कोणत्याही प्रकारची वेदना होत नाही आणि मला आता अधिक थकवाही जाणवत नाही. पण सराव सुरू करेपर्यंत थकवा जाणवतो की नाही हे कळणार नाही. मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की, काळजी करू नका कारण मी आता ठीक आहे.’

महत्त्वाचे म्हणजे 4 मे रोजी जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अमित मिश्राला कोरोनाची लागण झाली, तेव्हा साहाचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर बीसीसीआय आणि आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएल 2021 अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तथापि, बीसीसीआयने हे स्पष्ट केले आहे की आयपीएलचा हा हंगाम रद्द झाला नसून केवळ पुढे ढकलण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीचे पदार्पण होण्याच्या १५ वर्षांपूर्वीच ‘या’ भारतीय खेळाडूने खेळला होता हेलिकॉप्टर शॉट, बघा व्हिडिओ

‘या’ प्रमुख ३ कारणांमुळे भुवनेश्वर कुमारकडे श्रीलंका दौऱ्यात द्यायला हवे टीम इंडियाचे कर्णधारपद

इरफान पठाणने कंगणा राणावतला घेतले फैलावर, केले ‘असे’ ट्विट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---