---Advertisement---

पंतमुळे ‘या’ वरिष्ठ यष्टीरक्षकाच्या कसोटी कारकिर्दीवर पूर्णविराम! उरलाय केवळ निवृत्तीचा पर्याय

On: गुरूवार, ऑगस्ट 19, 2021 1:10 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा त्याच्या चतुर नेतृत्त्व शैली आणि फलंदाजीसाठी क्रिकेटजगतात प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त त्याने यष्टीमागेही कमालीची चपळता दाखवत आपला ठसा उमटवला होता. मात्र याच धोनीमुळे बऱ्याचशा युवा आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाजांना संघात जागा मिळणे कठीण झाले होते. असेच काहीसे भारतीय संघाचा सक्रिय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्याबाबत घडते आहे.

पंतने त्याच्या यष्टीमागील आणि यष्टीपुढील प्रदर्शनाने येणाऱ्या मोठ्या अवधीसाठी भारतीय संघातील आपली जागा पक्की केली आहे. पण त्याच्यामुळे एका वरिष्ठ यष्टीरक्षकाची कारकिर्द जवळजवळ संपुष्टात आली आहे. तो यष्टीरक्षक म्हणजे, वृद्धिमान साहा. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून संघाबाहेर
धोनीमुळे बऱ्याचदा संघातून आत-बाहेर होत राहिलेल्या साहाने धोनीच्या कसोटीतील निवृत्तीनंतर पुन्हा एकदा संघात आपला दबदबा निर्माण केला होता. पण पुढे पंतने संघात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा त्याची जागा धोक्यात आली. आता जर पंतला दुखापत झाली तरच साहाला तात्पुरते संघात मिळते.

भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याला फार कमी संधी मिळाल्या होत्या. याच दौऱ्यात ऍडलेड येथे त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यातही केवळ ९ आणि ४ धावांची निराशाजनक कामगिरी त्याने केली होती. दुसरीकडे पंतने हा दौरा गाजवत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात बहुमुल्य योगदान दिले होते. याच कारणामुळे साहाला मागील इंग्लंडच्या भारत दौऱ्यावेळी निवड होऊनही प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही. त्यानंतर सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठीही तो भारतीय संघाचा भाग आहे. पण अद्याप त्याला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळालेले नाही.

रिषभ पंतसोबत केएल राहुलही साहासाठी धोक्याची घंटा
पंतने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत पार पडलेल्या पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजीत खास प्रदर्शन केले नाही. लॉर्ड्स येथील दुसऱ्या सामन्यात ३७ आणि २२ धावांची खेळी केली आहे. तत्पूर्वी नॉटिंघम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात फक्त २५ धावांचे योगदान दिले होते. असे असले तरीही, दरम्यान यष्टीमागे त्याने अपेक्षित कामगिरी केली आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यातही त्याचे खेळणे निश्चित आहे.

पंतव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलही साहाच्या कसोटीतील पुनरागमनाच्या मार्गातील अडथळा ठरला आहे. त्याने काउंट सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकावत आपली दावेदारी सिद्ध केली होती. त्यानंतर नॉटिंघम कसोटीत ८४ धावांची झुंजार खेळी खेळली होती. पुढेही लॉर्ड्स कसोटीत १२९ धावा फटकावत कसोटी संघातील सलामीच्या स्थानावर ताबा मिळवला आहे.

त्यामुळे ३६ वर्षीय साहाची कसोटी कारकिर्द संपुष्टात आली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशात साहाकडे केवळ निवृत्ती घेण्याचा पर्याय उरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रिषभ पंत बनला ‘बाहुबली’, चक्क अक्षर पटेलला उचलून घेऊन केला वर्कआऊट; तुम्हीही पाहा

केवळ १५ कसोटींचा अनुभव असूनही भारताविरुद्ध का खतरनाक सिद्ध होईल मलान? घ्या जाणून

राहुल द्रविड नाही घेणार भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींची जागा! ‘मोठे’ कारण आले पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---